महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ मे ।कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ट्रेंडमध्ये काँग्रेसने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. सध्या काँग्रेस 128 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 77 आणि जेडीएस 17 जागांवर आघाडीवर आहे. एक जागा इतरांच्या खात्यात जात असल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक आयोगानुसार, काँग्रेस 57 जागांवर, भाजप 34 जागांवर, जेडीएस 7 आणि इतर 3 जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेसला 44.4 टक्के, भाजपला 37.7 टक्के आणि जेडीएसला 9.8 टक्के मते मिळालेली दिसत आहते.
जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी म्हणाले की, दोन ते तीन तास थांबा, सर्वकाही स्पष्ट होईल. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जेडीएसशी संपर्क साधल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल अपडेट…
काँग्रेस नेते सिद्धरामय्या वरुणा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे चित्तापूर मतदारसंघातून पिछाडीवर आहे.
रामनगरातील चन्नापटना विधानसभा मतदारसंघातून कुमारस्वामी पिछाडीवर आहेत.
कनकापुरा मतदारसंघातून काँग्रेसचे डीके शिवकुमार आघाडीवर आहेत.
हुबळी धारवाडमध्ये मतदारसंघातून काँग्रेस नेते जगदीश शेट्टर पिछाडीवर आहेत.