छत्रपती संभाजीनगर-नाशिक प्रवास ३ तासांत शक्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ मे । हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अाणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २६ मे रोजी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शिर्डीपासून नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील भरवीरपर्यंतचा ७९.७७ किमीचा हा टप्पा असेल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय सहसंचालक संजय यादव यांनी दिली. हा महामार्ग खुला झाल्याने छत्रपती संभाजीनगर ते नाशिक ३ तासात प्रवास शक्य होणार असून यात २ तास वाचणार आहेत. बहुचर्चित समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे गेल्या वर्षी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर शिर्डी ते भिवंडी यादरम्यानचा महामार्ग वाहतुकीसाठी केव्हा खुला होणार याची प्रतीक्षा होती. त्यानुसार आता एमएसआरडीसीने दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर हा ७९.७७ हा किमीचा महामार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला अाहे. समृद्धी महामार्गावरील शिर्डी येथील ५२०.९५१ किमीपासून ते भरवीर (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील ६००.२१ किमी यादरम्यानचे ७९.७७ किमीचे उद्घाटन होईल. दरम्यान, नाशिक ते नागपूर प्रवासासाठी पूर्वी १६ ते १८ तास लागत होते. अाता समृद्धी महामार्गामुळे हे अंतर सुमारे सात तासांवर अाले अाहे. म्हणजे १० ते १२ तास वाचतील. नाशिक ते छत्रपती संभाजीनगरसाठी पूर्वी ५ तास लागत होते. अाता हे अंतर ३ तासांवर अाले अाहे.

७०१ पैकी आता ६०० किमीचा मार्ग होणार सुरू
नागपूर ते अांबणे (भिवंडी) असा ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग अाहे. त्यातील पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी हे ५२०.९२१ किमी मार्गाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते डिसेंबर २०२२ रोजीच उद्घाटन झाले होते. अाता भरवीरपर्यंत ६००.१२८ किमीपर्यंत महामार्ग खुला होणार अाहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *