आज गुरुपुष्यामृत योग : आज सराफ बाजार फुलणार ; पहा खरेदीचा मुहूर्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ मे । पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यानंतर तो दिवस गुरुपुष्यामृत योग समजला जातो. या दिवशी सोने खरेदी केली जाते. वर्षभरात चार योग आले आहेत. हा दुसरा गुरुपुष्यामृत योग आहे.

पुष्य या शब्दाचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती-ऊर्जा देणारा आणि नक्षत्र म्हणजे सुखसंपदा देणारे असते. हे नक्षत्र कल्याणकारी, मनाला शांत करणारे असते. या नक्षत्रात तीन तारका दिसतात. त्या बाणाप्रमाणे दिसून येतात. वरचे टोक म्हणजे तुरा. या योगाला मांगलिक तारासुद्धा म्हटले जाते. या नक्षत्राचा स्वामी शनी आहे. म्हणून या दिवशी केलेले कार्य स्थिर होते,

पहाटे ५.५१ पासून ते सायं. ५.५२ पर्यंत मुर्हूत
गुरुवारी पहाटे ५.५१ मिनिटांपासून ते संध्याकाळी ५.५२ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी सुवर्ण, चांदी, गृहोपयोगी वस्तू, वास्तू खरेदी करणे योग्य आहे. या दिवशी व्यापाराची सुरुवात किंवा बंद पडलेली कामे सुरू करण्यास योग चांगला आहे. त्याचबरोबर जप, साधना करण्यासाठी दुर्मिळ योग आहे. मेरुश्री यंत्राची स्थापना केली तर व्यापारामध्ये वृद्धी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *