Meta Layoff : आर्थिक मंदीमुळे फेसबुक मेटाने दिला १०,००० कर्मचाऱ्यांना नारळ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ मे । Meta Layoff : फेसबुकची मूळ कंपनी मेटाने १०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. मेटाने केलेली ही कपात शेवटची कपात मानली जात आहे. कंपनीने मार्चमध्ये तीन फेऱ्यांमध्ये नोकर कपात केली जाईल असे जाहीर केले होते. त्यापैकी ही तिसरी फेरी आहे. त्यामुळे कंपनीने शेवटची नोकर कपात लागू केली, असल्याचे मानले जात आहे.

जगभरात टेक क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे खर्चकपात तसेच अन्य विविध कारणास्तव जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये नोकर कपात करण्यात आली आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटा ही देखील त्याला अपवाद नाही. फेसबुक मेटाने Meta Layoff मार्चमध्ये तीन टप्प्यात जाहीर नोकर कपात करण्याचे मार्चमध्ये जाहीर केले होते. त्यापैकी ही तिसरी सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. मेटाने मार्केटिंग, साइट सिक्युरिटी, एंटरप्राइझ इंजिनीअरिंग, प्रोग्राम मॅनेजमेंट, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स यांसारख्या टीम्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. त्यामुळे अनेकांना दुर्दैवाने नोकरी गेल्याने लिंक डिन वर नेले.

मेटा ही यावर्षीच्या सुरुवातीला, नोकरकपात करणारी पहिली मोठी तंत्रज्ञान कंपनी बनली. कंपनीने मागील दुसऱ्या फेरीत तब्बल ११००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. Meta Layoff
मार्चमध्ये, मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले की दुसर्‍या फेरीतील बहुतांश टाळेबंदी अनेक महिन्यांत तीन टप्प्यांत होईल, ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात मे मध्ये संपेल. त्यानंतर टाळेबंदीच्या छोट्या फेऱ्या होण्याची शक्यताही त्यांनी नमूद केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *