उकाड्यातून लवकरच पुणेकरांची सुटका होण्याचे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ मे । शहराकडे बाष्पयुक्त ढगांचा ओघ सुरू झाला असून, लवकरच उकाड्यापासून सुटका होण्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत. बुधवारी दुपारपासूनच शहरात गार वारे सुटले अन् सायंकाळी 7 वाजता पुणे वेधशाळेचे हवामान विभागप्रमुख अनुपम कश्यपी यांनी शहरावर बाष्पयुक्त ढग आल्याचे सॅटेलाइट छायाचित्र शेअर केले. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या उकाड्यातून लवकरच पुणेकरांची सुटका होण्याचे संकेत आहेत.

तापमानात 3 अंशांनी झाली घट…
मंगळवारी अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे दाखल झाले. त्याचा तत्काळ परिणाम दिसून आला. शहराचा पारा 40.3 अंशांवरून बुधवारी 37 अंशांवर खाली आला. बुधवारी सायंकाळी शहरात गार वारे सुटल्याने हवामान विभागाने हलका ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *