मी पुढचा मोसम खेळलो तर ते चाहत्यांसाठी बक्षिस असेल! IPL मधून निवृत्तीच्या मुद्दावर धोनीने मन मोकळे केले

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० मे । महेंद्रसिंग धोनीने हिंदुस्थानी क्रिकेट चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा धोनी सध्या 41 वर्षांचा असून त्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सला (CSK) आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. आयपीएलचा हा सीझन धोनीचा शेवटचा सीझन असेल की नाही, धोनी आणखी एका हंगामासाठी खेळताना दिसू शकतो का? यावर बरीच चर्चा सुरू आहे.

यंदाच्या आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर कर्णधार एमएस धोनीने आपल्या निवृत्तीबद्दल उघडपणे बोलला आहे. धोनीच्या बोलण्यावरून असे दिसते आहे की, तो पुढील सीझनमध्ये देखील सीएसकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ शिल्लक असल्याचे त्यांने सांगितले. धोनी म्हणाला की, “निवृत्ती घेण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे, पण लोकांचे प्रेम पाहून मला आणखी खेळण्याची इच्छा आहे. मी पुढचा मोसम खेळलो तर ते चाहत्यांसाठी बक्षिस असेल!”

या सीझनच्या सुरुवातीपासूनच हा धोनीचा शेवटचा सीझन असेल अशी चर्चा केली जात होती. प्रत्येक मैदानावर ज्याप्रकारे प्रेक्षकांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, त्यामुळे ती शक्यता अधिकच बळकट होत गेली. फायनलमध्ये गुजरात टायटन्सवर पाच विकेट्सने विजय मिळवल्यानंतर धोनीला जेव्हा विचारण्यात आले की हा त्याचा शेवटचा सीझन आहे का? तेव्हा तो म्हणाला, ‘तुम्ही बघाल तर. परिस्थितीनुसार, माझ्यासाठी निवृत्त होण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. आता मी निघतोय हे सांगणं माझ्यासाठी खूप सोपं आहे पण पुढचे नऊ महिने कठोर परिश्रम करून आणखी एक सीझन खेळून परतणे अवघड आहे. शरीराने देखील साथ द्यायला हवी. चेन्नईच्या चाहत्यांनी माझ्यावर ज्याप्रकारे प्रेमाचा वर्षाव केला आहे, मी पुढचा मोसम खेळलो तर ते या चाहत्यांसाठी बक्षिस असेल! त्यांनी माझ्यावर जे प्रेम आणि जी तळमळ दाखवली, त्यामुळे मीही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे’. पुढे धोनी म्हणाला की, ‘हा माझ्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा आहे. संपूर्ण स्टेडियम माझ्या नावाचा जयघोष करत होता. चेन्नईतही मला एवढेच प्रेम मिळाले. पण मी परत येईन आणि माझ्याकडून शक्य होईल तेवढे खेळेन’.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *