गोवा – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला ३ जून पासून सुरुवात; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखविणार हिरवा झेंडा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ मे । कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्‍स्‍प्रेसचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मडगाव – मुंबई सीएसएमटी वंदे भारतला ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ५ जूनपासून ही सेमी हाय स्पीड ट्रेन प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे.

वंदे भारत हायस्‍पीड ट्रेनच्या उद्घाटनासाठी मडगाव रेल्वे स्थानक सज्ज करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 5 जून पासून नियमित होणारी ही गाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही गाडी पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी, ठाणे येथून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी, पनवेल येथून सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी मिनिटांनी, खेड येथून सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी तर रत्नागिरीला भारत एक्सप्रेस सकाळी दहा वाजता येईल. दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी ही गाडी गोव्यात मडगावला पोहोचेल. मडगाव येथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी मुंबईसाठी सुटेल.

परतीच्या प्रवासात असतानाही गाडी रत्नागिरी येथून सायंकाळी ५ वाजून 35 मिनिटांनी असेल. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही गाडी पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी, ठाणे येथून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी, पनवेल येथून सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी, खेड येथून सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी तर रत्नागिरीला भारत एक्सप्रेस सकाळी दहा वाजता येईल. दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी ही गाडी गोव्यात मडगावला पोहोचेल. मडगाव येथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी मुंबईसाठी सुटेल. परतीच्या प्रवासात असतानाही गाडी रत्नागिरी येथून पाच वाजून 35 मिनिटांनी तर खेड इथून सहा वाजून 48 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना होईल.

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री दहा वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे. मुंबईकडून मडगावकडे जाताना कणकवली येथे ही गाडी अकरा वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल. मडगाव येथून सुटल्यावर मुंबइकडे जाताना कणकवली येथे ४ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. रायगड जिल्ह्यात रोहा व पनवेल येथे थांबा देण्यात आला आहे. मडगाव कडून मुंबईच्या दिशेने जात असताना रोहा येथे रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. पनवेल येथे अजून नऊ वाजून अठरा मिनिटांनी पोहोचेल. मुंबईवरून मडगावकडे जाताना रोहा येथे सकाळी सात वाजून 45 मिनिटांनी तर पनवेल येथे सकाळी सहा वाजून 38 मिनिटांनी पोहोचेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *