आदिकैलास ; पूर्वी पोहचायला 10 दिवस लागत, आता 5-6 तासांमध्ये दर्शन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ मे । उत्तराखंडमध्ये आदिकैलासाच्या दर्शनासाठी यात्रेकरूंचे आगमन सुरूच आहे. २० हजार ७०० फूट उंचीवरील आदी कैलास मार्गावर यंदा खूप जास्त हिमवृष्टी झाल्याने सर्वत्र बर्फ दिसतो. पहिल्यांदाच यात्रेकरू रस्त्याने ही यात्रा करत आहेत. यात्रा ४ मे रोजी सुरू झाली होती. ती नोव्हेंबरपर्यंत चालेल. ३२ दलांना मंजुरी मिळाली आहे. प्रत्येक जथ्थ्यात १२ यात्रेकरू आहेत.

आदिकैलास उत्तराखंडमध्ये तिबेटच्या सीमेवर, कैलास मानसरोवर तिबेटमध्ये आहे. कैलास मानसरोवराची प्रतिकृतीही म्हणतात

हे शक्य झाले कारण… पिथोरागडच्या जॉलजिबीपासून आदिकैलासपर्यंत ६५ किलोमीटरचा ऑल वेदर रोड तयार झाला आहे.

प्रगती : ८-१० दिवसांऐवजी ५ तास लागतात. पूर्वी जॉलजिबी ते गुंजी (आदि कैलास) पर्यंत १० दिवस लागत होते. आता ५-६ तास लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *