IPL 2023 : ‘हे’ 3 स्टार खेळाडू मॅच न खेळता झाले करोडपती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ मे । चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करून आयपीएल २०२३चे विजेतेपद पटकावले. पण आयपीएल 2023 मध्ये असे तीन खेळाडू आहेत ज्यांना एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. हे खेळाडू संपूर्ण हंगाम बेंचवर बसले. मात्र बेंचवर बसून हे खेळाडू करोडपती झाले आहेत. जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल.

ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडला गुजरात टायटन्सने 2.40 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याने आयपीएल 2022 मध्ये संघासाठी 10 सामन्यात 157 धावा केल्या. पण त्याला आयपीएल 2023 मध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळू शकली नाही. या कारणास्तव तो संपूर्ण हंगाम बेंचवर बसला. गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला. जिथे त्यांना CSK कडून पराभवाचा सामना करावा लागला.

आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने प्लेऑफपर्यंतचा प्रवास केला. दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसला मुंबई इंडियन्सने तीन कोटी रुपयांना खरेदी केले. पण कर्णधार रोहित शर्माने ब्रेविसला आयपीएल 2023 मध्ये एकाही सामन्यात संधी दिली नाही. तो पूर्ण वेळ बाकावर बसला होता. त्याने मुंबईसाठी आयपीएल 2022 च्या 7 सामन्यात 161 धावा केल्या होत्या.

भारतीय कसोटी संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतला गुजरातने 1 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी केले. पण भरतला आयपीएल 2023 च्या एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकली नाही. गुजरात संघात आधीच उपस्थित असलेल्या ऋद्धिमान साहाने यष्टिरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तर भरत हा भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या 10 सामन्यांत 199 धावा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *