महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ जुन । Gold Silver Price on 2 June 2023 : मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) वाढ झाल्यानंतर जूनच्या पहिल्या दिवशी पुन्हा सोन्या-चांदीचे दर कमी झाले आहेत. मात्र, चांदीच्या दरात वाढ कायम आहे. दरम्यान इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, गुरुवारी संध्याकाळी सोन्याचा भाव 60,157 रुपये होतो. तर आज (2 जून 2023) सकाळी 60113 रुपये दर आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात सकाळ ते संध्याकाळ 44 रुपयांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. आज 11 ग्रॅम 22 कॅरट सोने 55,850 रुपये तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 60, 930 रुपये झाले आहे.
मागील व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा (Gold Rate) भाव 60,390 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. परिणामी मागील दिवसाच्या तुलनेत 233 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घसरणीसह बंद झाला आहे. याशिवाय आज चांदीचा दर 71372 रुपये प्रति किलोवर बंद झाला. आज सकाळी हा दर 71350 रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडला. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत चांदीचा दर 22 रुपयांनी वाढला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, चांदीचा दर 70,980 रुपये प्रति किलो होता. त्यामुळेच कालच्या तुलनेत आज चांदीचा दर प्रतिकिलो 384 रुपयांनी वाढला आहे.
24, 23, 22 कॅरेटचा दर
ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,157 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटची किंमत 59,916 रुपये आणि 22 कॅरेटची किंमत 55,104 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याची किंमत 45,118 रुपये होता.