WTC Final 2023 : फलंदाजांना वाचवण्यासाठी गोलंदाजीचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुन । जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला; परंतु अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांनी तरी फलंदाजांना वाचवण्यासाठी हा निर्णय झाल्याचा दावा केला. (WTC Final 2023)

भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, ‘भारताने नाणेफेक जिंकली. त्यानंतर रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने मला आश्चर्य वाटले. मात्र, मला असे वाटते की, हा निर्णय आपल्या फलंदाजांना हिरव्यागार फ्रेश विकेटवर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांच्या मार्‍याचा सामना करावा लागू नये म्हणून घेण्यात आला.’

फारुख इंजिनियर पुढे म्हणाले की, ‘मला आशा आहे की मोहम्मद शमी आणि सिराज प्रभावी ठरतील. रोहितचा हा खूप धाडसाचा निर्णय होता. भारतीय संघात चेतेश्वर पुजारा महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. याचबरोबर विराट कोहली आणि शुभमन गिल यांचीही भूमिका मोठी आहे. आपल्याकडे चांगली फलंदाजी आहे, पण रोहितचा त्यांच्यावर विश्वास नसावा.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *