WTC फायनलच्या 48 तास आधी अश्विनला काय कळाले होते? ज्यामुळे तो होता संघाबाहेर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुन । काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंग केले. भारत सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्यापासून वंचित राहिला. ऑस्ट्रेलियाकडून भारताच्या 209 धावांनी झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारताच्या चुकांची बरीच चर्चा झाली, पण त्याहीपेक्षा जास्त चर्चा झाली ती फायनलमध्ये पाणी पाजताना दिसलेल्या आर अश्विनची.

जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज अश्विन अंतिम फेरीत बेंचवर बसला होता. त्यामुळे टीम इंडियावरही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता फायनलमध्ये प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यानंतर अश्विन स्वतः पहिल्यांदा बोलला. इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, अश्विनला अंतिम फेरीत खेळायचे होते, पण तसे झाले नाही. तरी तो यामुळे निराश झाला नाही. त्याचा असा विश्वास होता की हा त्याच्यासाठी धक्का नव्हता.

अश्विनने सांगितले की, त्याला अंतिम फेरीत खेळायचे होते, कारण त्यानेही टीम इंडियाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोलाचे योगदान दिले होते. अश्विनने सांगितले की, त्याला 48 तास आधीच कळले होते की तो बाहेर जाणार आहे. त्यामुळेच सहकारी खेळाडूंना विजेतेपद मिळवून देण्याचे त्याचे ध्येय होते.


अश्विनने सांगितले की, गेल्या फायनलमध्ये त्याने 4 विकेट घेतल्या होत्या. 2018-2019 पासून विदेशी खेळपट्ट्यांवर त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. फायनलमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड न झाल्याबद्दल तो पुढे म्हणाला की, मी याकडे प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या दृष्टिकोनातून पाहत आहे.

अश्विनने सांगितले की, गेल्या वेळी इंग्लंडमध्ये मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती. अशा स्थितीत इंग्लंडमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये 4 वेगवान गोलंदाज आणि एक स्पिनर कॉम्बिनेशन असावे, असे प्रशिक्षक आणि कर्णधाराला वाटले असेल.

तो पुढे म्हणाला की, कदाचित तो फायनलबाबतही असाच विचार करत असावा. अश्विनला आता मागे वळून पाहायचे नाही. हे योग्य नसल्याचे त्याने सांगितले. तो काय करू शकतो हे त्याला माहीत आहे. जर तो एखाद्या गोष्टीत सक्षम नसेल, तर सर्वप्रथम तो स्वतःचा टीकाकार बनतो आणि त्याच्या कमकुवतपणावर काम करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *