महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ओमप्रकाश भांगे – राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत नागरिकांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी औषधांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या ‘टास्क फोर्स ऑन आयुष फॉर कोविड’ने सुचवलेल्या मार्गदर्शक सूचनांचा यासाठी आधार घेण्यात आला आहे.
होमिओपॅथी औषधी
* आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्या. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा
कोर्स करा.
युनानी औषधी
* बिहिदाना ५ ग्रॅम, बर्गे गावजबान ७ ग्रॅम, उन्नाब दाने, सपिस्तान ७ दाणे, दालचिनी ३ ग्रॅम, बनपाशा ५ ग्रॅम यांचा काढा करून २५० मिलिलिटर
* पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळा व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून १ किंवा २ वेळा १५ दिवसांकरिता घ्या.
* खमीरा मरवारीद दुधासोबत ५ ग्रॅम दिवसातून दोनदा घ्या. (मधुमेही रुग्णांनी घेऊ नये.)
रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी आयुर्वेदिक औषधी
* संशमनी वटी १ गोळी दिवसातून दोनदा असे १५ दिवस.
* तुळस चार भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्याच्या भरड चूर्ण तयार करा. वरील औषधीचे तीन ग्रॅम भरड चूर्ण
* १०० मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५-७ मिनिटे ठेवा व नंतर हे पाणी प्या.
* च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करा (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करा).
* सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेल तेल किंवा हे बोटाने लावा.
* तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळ तेल/ खोबरेल तेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या करा.