Weather Update: पुढील 4 दिवस ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुन । जवळजवळ जून महिना संपत आला असला तरी अद्यापही मान्सूनने दडी मारली आहे. पावसाने अद्याप राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावलेली नाही. अशातच आता येत्या 4 दिवसांमध्ये राज्यातील वातावरण बदलून काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पुढील 4 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली आहे. उद्या 22 जूनला मुंबईत मध्यम तर 23-24 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

राज्यातील जवळपास सर्व भागांमध्ये येत्या 3 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 23-24 जूनला विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, 24 जूनला कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र हलक्या सरींचा अंदाज आहे.

पुण्यातही पुढील २ ते ३ दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये येत्या 3 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 23-24 जूनला विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *