महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुन । सोने-चांदीवर (Gold Silver Rate Today) जागतिक बाजारात दबाव आहे. अमेरिकन वायदे बाजारात सोने 14.30 अंकांनी घसरले तर चांदीत 0.78 अंकांनी घसरली. सोने 1955.80 वरुन थेट 1929.40 पर्यंत घसरले. भारतीय सराफा बाजारातही सोने-चांदीच्या किंमतीत चढउतार आहे. मंगळवारी सोने प्रति 10 ग्रॅम 59,345 रुपये होते. गेल्या आठवड्यात 16 जून रोजी हा भाव 59582 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीने मात्र दबाव झुगारला आहे. चांदीत 16 जून रोजी प्रति किलो 1358 रुपयांनी भाव वधारले होते. मे महिन्यापासून सोने-चांदीचा दर घसरला आहे. दोन्ही धातूला नवीन कोणताही विक्रम करता आलेला नाही.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
मंगळवारी 24 कॅरेट सोने 59345 रुपये, 23 कॅरेट 59107 रुपये, 22 कॅरेट सोने 54360 रुपये, 18 कॅरेट 44509 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34717 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.
दोन दिवसांत अशी झाली घसरण
गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोन्यात आज 20 जून रोजी 200 रुपयांची घसरण झाली. या किंमती 55,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचल्या. तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 60,150 रुपये झाल्या. काल हा भाव अनुक्रमे 55,350 रुपये आणि 60,210 रुपये होता. आज सकाळच्या सत्रातील किंमती जाहीर झाल्या नाहीत.
मे-जूनमध्ये घसरण
सध्या सोने 60,000 रुपयांच्या आतबाहेर खेळत आहे. चांदीत पण मोठी उसळी दिसलेली नाही. सोन्याचे भाव 1100 रुपयांच्या आसपास घसरले आहेत. मेनंतर जून महिन्यात पण सोने-चांदीने हेच नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. या दोन्ही धातूंना नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात सोने-चांदीने दरवाढीचे नवीन रेकॉर्ड तयार केले होते.