महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुन । सोने-चांदीला (Gold Silver Rate Today) मोठा झटका बसला. सोने-चांदीचे पानिपत झाले. दरवाढीला ब्रेक लागला. सोने-चांदीने फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात कहर केला होता. किंमती गगनाला भिडल्या होत्या. सोने आता लागलीच 70 हजारांच्या घरात पोहचतील असे वाटत असताना मे आणि जून महिन्यात दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमती पार जमिनीला टेकल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर वायदे बाजारातही सोने -चांदी दबावाखाली आले आहेत. वाढत्या किंमतींमुळे बऱ्याच खरेदीदारांनी सोने-चांदीतील गुंतवणूक दुसरीकडे वळवली होती. आज किंमती इतक्या दणक आपटतील असा कोणी दोन महिन्यांपूर्वी विचार सुद्धा केला नव्हता.
21 जून रोजी सोने दणकावून आपटले. मंगळवारी, एक दिवस अगोदर 24 कॅरेट सोने 59345 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. 243 रुपये घसरण होऊन बुधवारी सोने 58,864 रुपयांवर येऊन ठेपले. गुडरिटर्न्सनुसार, 21 जून रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 300 रुपयांनी घसरुन 54,850 रुपये तर 24 कॅरेट सोने 330 रुपयांनी घसरुन 59,820 रुपयांवर येऊन धडकल्या. सकाळच्या सत्रातील भाव अद्याप अपडेट केलेले नाही. किंमतीत चढउतार होऊ शकतो.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
बुधवारी, 21 जून रोजी 24 कॅरेट सोने 58,864 रुपये, 23 कॅरेट 58,628 रुपये, 22 कॅरेट सोने 53,919 रुपये, 18 कॅरेट 44148 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34435 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.चांदीत प्रति किलो 9 रुपयांची वाढ होऊन एक किलोचा दर 70,133 रुपये झाला. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.