July 2023 Bank Holidays: बँकांशी संबंधित कामे करून घ्या; जुलैमध्ये इतके दिवस बँका बंद, पाहा संपूर्ण यादी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुन । जुलै महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. पुढचा महिना बँकांच्या सुट्ट्यांचा आहे. अशा परिस्थितीत बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास ते त्वरित निकाली काढा. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जुलै महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पारंपारिक साप्ताहिक सुट्यांव्यतिरिक्त केर पूजा, मोहरम आणि आशुरा या सणांमुळे जुलै महिन्यात बँका बंद राहतील. आरबीआयने जारी केलेल्या यादीनुसार जुलै महिन्यात बँकांना १५ दिवस सुट्टी असेल. यामध्ये चौथ्या शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचाही समावेश आहे. पण याचा अर्थ असा नाही की सर्व शाखांमध्ये १५ दिवस कामकाज बंद राहील. काही बँकांना राज्यानुसार सुट्ट्याही असतात.


पुढील महिन्यात मोहरमनिमित्त त्रिपुरा, झारखंड, पश्चिम बंगाल, मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील बँका बंद राहतील.

जुलै २०२३ बँक सुट्ट्यांची यादी

२ जुलै – रविवार

५ जुलै (बुधवार) – गुरु हरगोविंद जी यांची जयंती – जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

६ जुलै (गुरुवार) – MHIP दिवस – मिझोराममध्ये बँका बंद राहतील.

८ जुलै – दुसरा शनिवार

९ जुलै – रविवार

११ जुलै (मंगळवार) – केर पूजा, या दिवशी त्रिपुरामध्ये बँका बंद राहतील.

१३ जुलै (गुरुवार) – भानू जयंती, सिक्कीममध्ये या दिवशी बँका बंद राहतील.

१६ जुलै – रविवार

१७ जुलै (सोमवार) – यू तिरोट सिंग डे, या दिवशी मेघालयमध्ये बँका असतील.

२१ जुलै (शुक्रवार) – Drukpa Tshe-zi, सिक्कीममध्ये या दिवशी बँका बंद राहतील.

२२ जुलै – चौथा शनिवार

२३ जुलै – रविवार

२८ जुलै (शुक्रवार) – आशुरा, या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये बँका बंद राहतील.

२९ जुलै (शनिवार) – मोहरम (ताजिया) – त्रिपुरा, मिझोराम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बंगाल, नवी दिल्ली, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *