कर्मचारी मारहाण प्रकरण भोवलं; आमदार परबांसह 25 जणांविरुध्द गुन्हा, चार जण अटकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुन । महानगरपालिका कर्मचारी मारहाण प्रकरणी (Mumbai Municipal Corporation) महत्वाची बातमी समोर आलीये. महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयातील असिस्टंट इंजिनियर पाटील यांना काल शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती.

याप्रकरणी आता मुंबईच्या वाकोला पोलिसांनी (Vakola Police) शिवसेना गटाचे आमदार आणि विभाग प्रमुख अॅड. अनिल परब (Anil Parab) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनिल परब यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी इतर फरार असलेल्या आरोपींचा वाकोला पोलीस शोध घेत आहेत. मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कलम 353, 332, 506 आणि 34 भा.द.वी नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर वाकोला पोलिसांनी माजी नगरसेवक सदा परब, माजी नगरसेवक हाजी हलीम खान, शाखाप्रमुख संतोष कदम,शाखाप्रमुख उदय दळवी यांना अटक केली.सध्या वाकोला पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवून फरार आरोपींची धरपकड सुरू केली आहे. या मारहाणीनंतर वाकोला पोलिसांनी 13 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र, सीसीटिव्ही कॅमेरे तपासल्यानंतर यातील काही जणांना सोडून देण्यात आलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *