महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ जुलै । Konkan Railway Mega block: कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी 7 जुलै रोजी Mega block घेण्यात येणार आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कोकण मार्गावर मालमत्ता देखभालीचे काम हाती घेण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि रायगड जिल्ह्यातील वीर विभागादरम्यान दुपारी 12.20 वाजता हा मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक दुपारी 3.30 वाजता संपणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे 6 जुलै रोजी सुटणारी 20910 क्रमांकाची पोरबंदर कोच्युवेली एक्स्प्रेस रोहा-वीर विभागादरम्यान 1 तास 50 मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. तसेच 6 जुलै रोजी सुटणारी 12432 क्रमांकाची तिरुअनंतरपुरम-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरी-खेड विभागादरम्यान 30 मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.
7 जुलै रोजी सुटणारी16345 क्रमांकाची तिरुअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेसही रोहा-वीर विभागात 35 मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.
याआधीही 21 जूनला कोकण रेल्वे मार्गावर तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते वैभववाडीदरम्यान देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला होता.