महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ जुलै । मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुटल चर्चा सुरू झाल्या. मनसेने ठाकरे गटाकडे युतीसाठी प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर आता स्वत: मनसे नेते राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रीया दिली. ठाकरे गटासोबत युती संदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी स्पष्टी करण दिले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युतीसाठी ठाकरे गटापुढे कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचे स्पष्ट करत या चर्चेतील हवाच काढून टाकली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे गटाला युती संदर्भात कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितले. या चर्चांवर ठाकरे गटाकडूनही स्पष्टीकरण आले आहे, खासदार संजय राऊत यांनी सांगितले, असा कोणताही प्रस्ताव मनसेकडून आलेला नाही.
दरम्यान, अभिजीत पानसे यांनीही यावर प्रतिक्रीया दिली. त्यांनी युतीचा प्रस्ताव दिल्याच्या फेटाळून लावल्या. पानसे म्हणाले, मी संजय राऊत यांना युतीचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. मी फार छोटा माणूस आहे. राज व उद्धव ठाकरेंनी एकत्र यायचे की नाही, याचा निर्णय दोघांनीच घ्यायचा आहे. पक्षात माझ्याहून अनेक वरिष्ठ नेते आहेत.युती संदर्भाात तसा काही प्रस्ताव असेल तर पक्षातील वरिष्ठ नेते यावर चर्चा करतील, असंही पानसे म्हणाले.