Hema Malini : ‘सत्यम शिवम सुंदरम’मध्ये झळकणार होत्या हेमा मालिनी; पण… ; हेमा मालिनी यांनी केलं कास्टिंग काऊचबद्दल भाष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । Hema Malini Reveals Film Maker Director Truth : बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी (Hema Malini) सध्या चर्चेत आहेत. हेमा मालिनी मनोरंजनसृष्टीपासून दूर असल्या तरी राजकारणात मात्र सक्रीय आहेत. आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील गोष्टींवर आणि कास्टिंग काऊचबद्दल भाष्य केलं आहे.

हेमा मालिनींचा मोठा गौप्यस्फोट
हेमा मालिनी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत दिग्दर्शकाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका दिग्दर्शकाने त्यांना साडीची पिन काढण्यास सांगितले होते. हेमा मालिनी म्हणाल्या,”एक सीन शूट करताना मी नेहमीप्रमाणे साडीच्या पदराला एक पीन लावली होती. पण समोर बसलेल्या त्या दिग्दर्शकाने मला ती पीन काढण्यास सांगितली. त्यावेळी मी त्याला पदर खाली पडेल, असं सांगितलं. त्यावर तो दिग्दर्शक म्हणाला,”आम्हाला हेच हवं आहे”.

‘सत्यम शिवम सुंदरम’मध्ये झळकणार होत्या हेमा मालिनी; पण…
हेमा मालिनींनी राज कपूर (Raj Kapoor) यांच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. ‘सत्य शिवम सुंदरम’ या ब्लॉकबस्टर सिनेमात अमान आणि शशी कपूर मुख्य भूमिकेत होते. 1978 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण सर्वात आधी या सिनेमासाठी हेमा मालिनींना विचारणा झाली होती. पण राज कपूर यांच्याबद्दलच्या वाईट अनुभवामुळे त्यांनी हा सिनेमा करण्यास नकार स्पष्ट नकार दिला.

हेमा मालिंनींनी नकार दिल्यानंतर राज कपूर त्यांना म्हणाले होते,”सत्यम शिवम सुंदरम’ (Satyam Shivam Sundaram) हा एक चांगला सिनेमा असूनही तू आता हा सिनेमा करणार नाहीस. पण माझी इच्छा आहे की, तू हा सिनेमा करावा. तुझ्यासारख्या अभिनेत्रीने या सिनेमाचा भाग व्हावा. राज कूपर माझ्यासोबत बोलत असताना माझी आईदेखील बाजूला बसली होती. पण सिनेमाचं कथानक ऐकल्यानंतरही मी नकार दिला”.


हेमा मालिनींनी केलेत 100 पेक्षा अधिक सिनेमे (Hema Malini Movies)
हेमा मालिनी यांनी 1960 मध्ये मनोरंजनसृष्टीत काम करायला सुरुवात केली. गेल्या पाच दशकांत त्यांनी 100 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे. रुपेरी पडदा गाजवल्यानंतर त्यांनी 2004 मध्ये राजकारणात एन्ट्री केली. गेल्या काही दिवसांपूर्वी करण देओलच्या लग्नसोहळ्याला हजेरी न लावल्याने हेमा मालिनी चर्चेत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *