Adipurush Leaked On YouTube: ‘आदिपुरुष’ झाला ऑनलाईन लिक; अल्पावधीतच मिळाले मिलियन व्ह्यूज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । Adipurush Leak On YouTube News: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’चित्रपट सध्या तुफान चर्चेत आला आहे. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली असल्याची चर्चा झाली होती, पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना कथा, व्हिएफएक्स आणि काही भूमिकेवरून ट्रोल केलं.

या चित्रपटावर चौफेर टीका होत असताना, निर्मात्यांना आणखी एक मोठा झटका मिळाला आहे. कमाईत सपशेल अपयशी ठरलेला, बजेटची निम्मी कमाई पार करण्यासाठी देखील अपयशी ठरलेला ‘आदिपुरुष’ यु ट्यूबवर लीक झालाय.

प्रभासच्या चित्रपटाच्या लिस्टमध्ये या चित्रपटाच्या नावावर फ्लॉपचा शिक्का बसला आहे. News 18 ने दिलेल्या माहितीनुसार, ‘आदिपुरुष’ चित्रपट युट्यूबवर लीक झाला असल्याची माहिती मिळत आहे. हा युट्युबवर युजर्सला HD स्वरूपात पाहण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. मुख्य बाब म्हणजे, चित्रपटाने काही वेळातच युट्युबवर 2.3 मिलीयनहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेच. मात्र, काही वेळातच ‘आदिपुरुष’ चित्रपट युट्यूबवरून डिलीट केला आहे.

दरम्यान, चित्रपट यूट्यूबवर लीक झाल्यानं ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांसह दिग्दर्शकांना देखील मोठा धक्का बसला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा चित्रपट आजही बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासाठी संघर्ष करत आहे. अशातच हा चित्रपट ऑनलाइन पायरसीचा बळी ठरला.

News 18 ने दिलेल्या माहितीनुसार, HD प्रिंट लिक झालेल्या या चित्रपटाला युट्युबवर काही वेळातच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र लाखो युजर्सने चित्रपट पाहिला असला तरी, काही तासातच युट्युबवरून ही लिंक काढून टाकण्यात आली.

दिग्दर्शक- निर्माते ओम राऊत आणि चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर शुक्ला या दोघांनाही सोशल मीडियावर चित्रपटाच्या कथेवरून आणि चित्रपटातील काही भूमिकेमुळे खूप ट्रोल करण्यात आले. चित्रपटातील संवादामुळे लोकांच्या भावना दुखावल्याचे अनेकांचे मत आहे. वादानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या संवादांमध्ये बदल केले असले तरी नेटकऱ्यांनी चित्रपटाला कायम तुफान विरोध केला. चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी ट्विट करत चित्रपटामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप मान्य केले. याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे.

मनोज मुंतशीर ट्वीटमध्ये म्हणच, “आदिपुरुष चित्रपटामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे मी मान्य करतो. माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ, आदरणीय ऋषीमुनी आणि श्री राम भक्तांची मी हात जोडून बिनशर्त माफी मागतो. भगवान बजरंगबली आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो, एक आणि अतूट राहण्याची आणि आपल्या पवित्र शाश्वत आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो!”.

‘आदिपुरुष’चित्रपट महाकाव्य रामायणावर आधारित असलेला हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित झाला. ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या, या चित्रपटाने आतापर्यंत भारतात बॉक्स ऑफिसवर १२८ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *