Akshay Kumar | या भूमिकेसाठी अक्षय कुमार ने सोडला मांसाहार ; पहा कोणी दिला होता सल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । बॉलिवूडमधील सेलब्रिटी कायम त्यांच्या फिटनेस आणि डाएटमुळे चर्चेत असतात. एवढंच नाही तर सेलिब्रिटी ते घेत असलेल्या आहाराबद्दल देखील चाहत्यांना सांगतात. पण काही सेलिब्रिटींना मात्र मांसाहार करायला प्रचंड आवडतं. एक काळ असा होता जेव्हा अभिनेता अक्षय कुमार मासे-मटणावर ताव मारायचा. पण आता खिलाडी कुमारने मांसाहार सोडून दिला आहे. यामागे देखील मोठं कारण आहे. आयुष्यात आलेल्या एका प्रसंगानंतर अभिनेत्याने मांसाहार करण सोडून दिलं. मांसाहार करु नकोस असा सल्ला अक्षय कुमार याला त्याच्या आईने दिला होता. अभिनेत्याने आईच्या सल्ल्यानुसार मांसाहार करणं सोडून दिलं.


सांगायचं झालं तर, अक्षय कोणत्या सिनेमात कोणती भूमिका साकारणार आहे याबद्दल सर्व माहिती अभिनेत्याच्या आईला असायची. एवढंच नाही तर अक्षयच्या आई अरुणा मुलाला अनेक महत्त्वपूर्ण सल्ले देखील द्यायच्या. जेव्हा अरुणा यांना कळलं की, ‘ओ माय गॉड’ सिनेमात अक्षय कृष्णाची भूमिका साकारणार आहे. तेव्हा त्यांनी मुलाला मांसाहार करु नकोस असा सल्ला दिला होता.

रिपोर्टनुसार, अरुणा मुलाला म्हणाल्या, ‘सिनेमाचं शुटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत मांसाहार करु नकोस. कारण तू देवाच्या भूमिकेत दिसणार आहेस…’ आईने दिलेला सल्ला अक्षय याला आवडला आणि त्याने ‘ओ माय गॉड’ सिनेमाचं शुटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत मासे – मटण न खाण्याचा निर्णय घेतला.

अखेर ‘ओ माय गॉड’ सिनेमाचं शुटिंग पूर्ण झालं. सिनेमा प्रदर्शित झाला पण अक्षय याने मासे – मटणाचा त्याग केला. मांसाहार करणं सोडल्यानंतर ते पुन्हा खाण्याची अक्षय याची इच्छाच झाली नाही. अक्षय कुमार याने ‘ओ माय गॉड’ सिनेमानंतर मांसाहार करणं सोडून दिलं.

अभिनेत्याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अक्षय लवकरच ‘ओ माय गॉड २’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. मंगळवारी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाच्या टीझरने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. सध्या सर्वत्र खिलाडी कुमार याच्या ‘ओ माय गॉड २’ सिनेमाची चर्चा सुरु आहे.

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड ’ सिनेमा नास्तिक कांजीलाल मेहता याच्या कथे भोवती फिरत होता. पण सिनेमाच्या सिक्वलमध्ये पंकज त्रिपाठी यांची शंकरावर असलेली निस्सिम भक्ती दिसून येत आहेत. पंकज त्रिपाठी सिनेमात कान्ती शरण मुदगल ही व्यक्तीरेखा साकारताना दिसत आहे.

दिग्दर्शक अमित राय दिग्दर्शित ‘ओह माय गॉड 2’ सिनेमा १ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत यामी गौतम आणि अरुण गोविल यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *