महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । Why Should Not Eat Non-Veg In Shravan In Marathi : बरेच लोक चातुर्मासात वेगवेगळे नेम करतात. या चार महिन्यांच्या काळात वांगी, कांदे लसूण असे बरेच पदार्थ न खाण्याचा नेम असतो. पण बहुतांश लोक या चार महिन्यांपैकी फक्त श्रावण महिना पाळतात. श्रावण पाळणे म्हणजे या पवित्र महिन्यात ते मांसाहार आणि आम्ली पदार्थांचे सेवन करत नाहीत.
हिंदू धर्मात श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे या काळात धार्मिक कार्य अधिक करावे असे सांगितले जाते. त्यातील एक भाग मांसाहाराचा त्याग हा असतो. पण या महिन्यात मांसाहार न करण्यामागे काही वैज्ञानिक कारणंही आहेत.
हिंदू कॅलेंडरनुसार श्रावणमहिन्याला विशेष महत्व आहे. यंदा श्रावणाला लागून अधिकमास आला आहे. त्यामुळे हा दोन महिन्यांचा कालावधी अधिकाधीक पुण कमवण्याचा काळ असल्याचं ज्योतिषतज्ज्ञ सांगत आहेत. श्रावणातच अनेक सणवार येतात आणि ते मोठ्या थाटात साजरेही होतात.
श्रावणात भगवान शंकराच्या उपासनेला विशेष महत्व असते. त्यामुळे मांसाहार धार्मिकदृष्ट्या निषिद्ध मानले जाते.
काय आहे वैज्ञानिक कारण?
श्रावणात ऊन, पावसाचा खेळ सुरू असतो. त्यामुळे या काळात रोगराई वाढण्याची, बुरशी आणि विषाणूंचे संक्रमणाचे प्रमाण वाढलेले असते.
अन्न पदार्थ लवकर खराब होतात.
हे दुषित संक्रमण मांसाहारवर लवकर होण्याची शक्यता जास्त असते. असे पदार्थ खाणे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असते.
अध्यात्माकडे वाढता कल
प्राण्याचे आजारपण, प्रजनन
या काळात डेंग्यू, चिकन गुनियासारखे आजार वाढलेले असतात. जनावरांमध्येही आजारपण वाढलेले असते. अशा आजारी जनावराचे मांस खाण्यात आले तर ते हानिकारक ठरू शकते.
श्रावण हा अनेक प्राण्यांचा प्रजनन काळ असतो. विशेषतः मासे व अन्य प्राण्यांसाठी गर्भधारणेचा काळ असतो. पण या काळात मासेमारी किंवा प्राण्याची कत्तल सतत होत राहिली तर त्यांच्या प्रजाती धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे याकाळात मांसाहार करू नये असं सांगितलं जातं.
पचनशक्ती कमकुवत
पावसाळ्यात वातावरणात आद्रता, ओलसरपणा वाढलेला असतो. त्यामुळे आपली पचनशक्ती कमी झालेली असते. मांसाहार पचायला जास्त वेळ लागतो. कमकुवत पचनशक्तीमुळे मांसाहारी अन्न आतड्यांमध्ये साठून राहून सडते. त्यामुळे पोटाचे अनेक विकार उद्भवतात.
काय खावे
या काळात पचायला सोपे, हलके, साधे जेवण करणे कधीही योग्य.