महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । या वर्षी, श्रावण महिन्यामध्ये अधिक महिना आल्याने श्रावण 59 दिवसांचा म्हणजेच दोन महिन्यांचा असणार आहे. हा त्या वर्षातला अतिरिक्त महिना असतो. पंचांगानुसार, दर तीन वर्षांतून एकदा एक अतिरिक्त महिना येतो, ज्याला अधिकारमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात.
हिंदू धर्मानुसार, जगातील प्रत्येक जीव हा पाच घटकांनी (जल, अग्नि, आकाश, वायू आणि पृथ्वी) बनलेला आहे.ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यांसह ध्यान, ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच अधीकामासा दरम्यान परम शुद्धतेसाठी गंगास्नान केले जाते. यामुळे वक्तीला नवीन उर्जा मिळते.
जावई वाण –
आपल्या सणांचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक सणामध्ये नात्यातील ऋणानुबंध आपसूकच दृढ होतात. प्रत्येक सण आपणांस प्रत्येक नात्याला मानाने वागवण्यास शिकवते. मग ते नाते पतीपत्नीचे असो वा सासर- माहेर दोन्हीकडचे असो, नात्यांमधील प्रेम अबाधित ठेवण्याचे काम हे महीने आणि उत्सव करत असतात. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा देखील असाच एक नात्याचा धागा जपणारा महिना आहे. तो धागा म्हणजे सासू सासरे आणि जावयाचे नाते. आपल्या मुलीचा नवरा प्रत्येक आईवडिलांना नारायणा समान भासतो. अधिक मास हा श्री विष्णुच्या उपासनेचा असल्यामुळे, नारायणरूपी जावयाला मुलीचे आईवडिल घरी बोलावून त्याला मानाने वाण देतात. त्यामुळेच या महिन्यात जावयाला अधिक महत्व देण्याची पद्धत आहे.
जोडवी बदलण्याचा मुहूर्त –
जोडवी हा सुवासिनीचा अलंकार असून ते पायात घातले जातात.अधिक मासाचे निमित्त साधून दर तीन वर्षांनी जोडवी बदलण्याची रीत आहे. अधिक मासाची आठवण म्हणून देखील नवीन जोडवी घेतली जातात. आणि नात्यांचे ऋणानुबंध दृढ केले जातात. सत्यम ज्वेलर्स म्हणजे आपल्या पिंपरी-चिंचवड परिसरातील ४० वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास खऱ्या अर्थाने मिळवणारी पेढी. ग्राहक आम्हां सत्यम ज्वेलर्सकडे फक्त सोने खरेदी करण्याचं ठिकाण म्हणून कधीही बघत नाहीत तर आपल्या आयुष्याच्या चढ-उतारात, गोड-सुखी क्षणांत सत्यम ज्वेलर्सला आपला सोबती मानतात. आणि आम्हीही ग्राहकांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देत नाही. आम्हां सत्यम ज्वेलर्सकडे पिढ्यान-पिढयांचा ग्राहकवर्ग आहे. ७० वर्षांच्या आजी-आजोबांपासून २५ वर्षांच्या तरुणाईपर्यंत सगळ्यांना सत्यम ज्वेलर्स आपलेसे वाटते.
अधिक मासानिमित्त सत्यम ज्वेलर्स घेऊन आले आहेत अप्रतिम कारागिरी असलेले चांदीच्या दागिन्यांची असंख्य विविधता. त्याबरोबरच चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर आपणांस मिळेल चक्क २५% पर्यंत घसघशीत
सूट.
चला तर मग, आपल्या जावयासाठी आणि लेकीसाठी मनसोक्त खरेदी करा सत्यम ज्वेलर्समध्ये आणि नात्यांना
दृढ करा !