Manipur Viral Video : संताप ; संतप्त जमावाने ‘त्या’ नराधमाचं घरच पेटवलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । इंफाळ |   मणिपूर येथे मे महिन्यात दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल स्वत: सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपीला पकडण्यातही पोलिसांना यश आलं आहे. आरोपीला पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाने या आरोपीचे घरच पेटवून दिलं आहे. आरोपीच्या घराला आग लावून जमावाने निषेध नोंदवला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये काही नराधम दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढत असल्याचं दिसत आहे. या महिला विव्हळत, गयावया करत सुटकेची विनंती करताना दिसत आहे. त्यानंतर काही लोक या महिलांना शेतात ओढून नेताना दिसत आहे. याच ठिकाणी या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली आहे. ठिकठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. आंदोलन केलं जात आहे. निदर्शने होत आहेत. संसदेतही काल आणि आज या घटनेचे पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेतही या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि मणिपूर सरकारला चांगलंच फटाकरलं आहे. त्यानंतर पोलिसांनी खडबडून जागे होत चार आरोपींना अटक केली आहे. त्यातील मुख्य आरोपीचं नाव हुउरेम हेरोदास असं आहे. हेरोदासला अटक झाल्यानंतर आणि तोच या घटनेचा करताकरविता असल्याचं समजल्यानंतर त्याच्या शेजारी राहणाऱ्यांनी त्याच्या घराला आग लावली आहे. आरोपीचं घर नोंगपोक सेकमाई पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं. गुरुवारी संध्याकाळी शेजारीपाजारी एकत्र आले आणि त्यांनी हेरोदासचं घर पेटवून दिलं.

महिलांनीच पेटवलं घर
विशेष म्हणजे हेरोदासच्या घराला महिलांनीच आग लावली आहे. महिलांनीच त्याच्या घरावर चाल करत जाळपोळ करून आपला संताप व्यक्त केला आहे. या महिलांनी संतप्त भावनाही व्यक्त केल्या आहेत. या महिला मेतई समाजातील आहे. भलेही आरोपी आमच्या समाजातील असेल. पण अशा प्रकारच्या कृत्यांचं आम्ही कदापि समर्थन करणार नाही, असं या महिलांनी म्हटलं आहे.

चार आरोपी कोण?
ज्या चार लोकांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांची नावे पोलिसांना कळल्याचं समजतं. मीडिया रिपोर्ट्स नुसार हेरोदासच्या शिवाय युमलेमबम जीबान, खुनडोंगबम अरुन आणि निनगोमबम टोम्बा असं या आरोपींचं नाव आहे. नोंगपोक येथील कमाई येथील हे रहिवासी असल्याचं सांगितलं जातं. हेरोदासला येरीपुक बाजारातून अटक केली आहे. तो मूळचा यैरिपोक बिष्णूनाहा येथील रहिवासी आहे. मात्र, वडिलांच्या निधानानंतर तो पेची येथे आजीकडे राहायला आला होता. तर जीबान स्वत:हून पोलिसांना शरण आला. अरुण नोंगपोक सेकमाई आणि टोम्बा यांना कोंगबा येथून गुरुवारी संध्याकाळी अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *