Heavy Rainfall Alert: महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांना २७ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांपासून अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाने झोडपले आहे. दरम्यान आज (दि.२४ जुलै) भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक विभागाने दिलेल्या बुलेटिननुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना २७ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट (Heavy Rainfall Alert) देण्यात आला आहे. दरम्यान या जिल्ह्यांमध्ये गुरूवारपर्यंत (दि.२७ जुलै) अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान उद्या (दि.२५ जुलै) मुंबईतही मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे देखील मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीत, सांगितले आहे. तसेच 24 जुलैपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने 25 ते 27 जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भाला ऑरेंज अलर्ट (Heavy Rainfall Alert) देण्यात आला आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात सोमवारी कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे वार्‍याचा वेग वाढला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भाला 27 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट (Heavy Rainfall Alert) देण्यात आला आहे. मान्सूनचा ट्रफ अद्यापही राजस्थानात असल्याने उत्तर भारतात पावसाचा जोर कायम आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, गुजरात राज्यात जोरदार पाऊस पडत आहे,असे देखील हवामान खात्याने दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *