महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । मागील काही वर्षांपासून वंध्यत्वाची समस्या खूप वाढली आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही वंध्यत्वाचे बळी ठरत आहेत. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि आरामदायी जीवनशैलीमुळे ही समस्या वाढत आहे. आता वंध्यत्वाच्या उपचारासाठी IVF (In Vitro Fertilization) ची मदत घेण्याचा ट्रेंडही खूप वाढला आहे. शहरी भागात आयव्हीएफ क्लिनिकची संख्या वाढत आहे. आयव्हीएफच्या मदतीने अपत्यहीन जोडप्यांना अपत्याचा आनंद मिळू शकतो, मात्र त्यासाठी या प्रक्रियेची मदत कधी घ्यावी आणि त्यासाठी किती खर्च येतो, हे जाणून घेतले पाहिजे.
आयव्हीएफ म्हणजे काय ते आपण आधी सांगू. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, IVF च्या माध्यमातून स्त्रीचे अंडे आणि पुरुषाचे शुक्राणू लॅबमध्ये फलित केले जातात. यापासून तयार झालेला भ्रूण पुन्हा स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जाते. या प्रक्रियेत फारसा त्रास होत नाही.
कधी घ्यावी IVF ची मदत ?
याबाबत वीर IVF चे डॉक्टर राहुल वीर सांगतात की, जर एखादे जोडपे एक वर्ष कोणत्याही संरक्षणाशिवाय शारीरिक संबंध ठेवत असेल, तरीही मूल होत नसेल, तर हे वंध्यत्वाचे लक्षण आहे. अशी जोडपी आयव्हीएफची मदत घेऊ शकतात.
अशा जोडप्यांमध्ये घेतली जाऊ शकते IVF ची मदत
# फॅलोपियन ट्यूब अवरोधित आहे.
# दीर्घकाळ PCOD ही समस्या
# ग्रेड ४ इन्डोमेट्रिऑसिस
# पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी
# शुक्राणूंची गुणवत्ता चांगली नसणे
कोणत्या वयात फायदेशीर आहे IVF करणे ?
तज्ज्ञ सांगतात की वयाच्या 35 वर्षापर्यंत आयव्हीएफ करणे जास्त फायदेशीर आहे. IVF करण्यापूर्वी जोडप्यांच्या अनेक प्रकारच्या चाचण्या आहेत. यामध्ये, स्त्रीला कोणताही धोकादायक संसर्ग (एचआयव्ही, कर्करोग) नाही याची खात्री केली जाते. तसेच पुरुषांमध्येही कोणताही संसर्गजन्य रोग नाही ( हिपॅटायटीस , एचआयव्ही, कर्करोग)आणि इतर कोणत्याही विषाणूजन्य संसर्ग नाही याची खात्री केली जाते. त्यानंतरच आयव्हीएफ केले जाते.
किती आहे त्याचा खर्च
आयव्हीएफला एक लाख ते तीन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. पण हे उपचार कुठे केले जात आहेत, यावर अवलंबून आहे.