Shirish Kanekar Passed Away 80 : लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । Shirish Kanekar Passed Away 80 : आपल्या सिद्धहस्त लेखणीनं गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पत्रकार, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या शिरीष कणेकर यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या महिन्यात ६ जून रोजी त्यांनी ८० वा वाढदिवस साजरा केला होता.

चित्रपट, संगीत क्षेत्रातील वेगवेगळ्या घडामोडींवर खुमासदार लेखन करुन त्यांनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले होते. समाजकारण, राजकारण, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील विविध घडामोडींवर त्यांचे लेखन वाचकप्रिय झाले होते. त्यांचे कणेकरी, माझी फिल्मबाजी नावाचे कार्यक्रम विशेष लोकप्रिय होते.

कणेकर यांना काही दिवसांपूर्वी कॅनडाच्या पंतप्रधानांकडून गौरविण्यात आले होते. याशिवाय साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते. विविध वृत्तपत्र, मासिकांमधून चित्रपट, साहित्य आणि क्रीडाविषयक क्षेत्रातील अनेक घडामोडींवर त्यांनी केलेलं लेखन लोकप्रिय झाले होते. त्यांची 30 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

षटकार, चंदेरी सारख्या मासिकांमधून कणेकर यांनी केलेले लेखन हे कित्येक वाचकांच्या उत्सुकतेचा आणि कौतूकाचा विषय होता. त्यामुळेच की काय त्यांचे लेखन वाचण्यासाठी वाचक नेहमीच त्यांच्या नव्या लेखाची प्रतिक्षा करायचे. त्यांच्या जाण्यानं साहित्य, क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

शिरीष कणेकर यांचा अल्पपरिचय

पत्रकार,चित्रपट व क्रिकेट समीक्षक,ललित लेखक,एकपात्री कलाकार

नाव : शिरीष मधुकर कणेकर

जन्म : ६ जून १९४३,पुणे (महाराष्ट्र)

मूळ गाव : पेण,जिल्हा रायगड

शिक्षण – मुंबई विद्यापीठाची कायद्याची पदवी

वृत्तपत्रीय कारकीर्द : इंडियन एक्सप्रेस, डेली’, ‘फ्री प्रेस जर्नल’, ‘सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी,

पहिले लेखन – : जोर्जं गन :एक लहरी फलंदाज (‘अमृत’,जानेवारी १९६४)

ग्रंथलेखन : ‘क्रिकेट-वेध ‘(प्रथम प्रकाशन १९७७), ‘गाये चला जा ‘(प्रथम प्रकाशन १९७८), ‘यादो की बारात’, व्यावसायिकाची व्यक्तिचित्रे, पुन्हा यादों की बारात , ‘शिरिषासन, ‘फिल्लमबाजी’, ‘पुन्हा शिरिषासन’, ‘कणेकरी’, ‘नट बोलट बोलपट’ (प्रथम प्रकाशन १९९९ ‘शिनेमा डॉट कॉम ‘(प्रथम प्रकाशन २००१).दुसरी आवृत्ती २००७

ललित – ‘चाहटळणी’, ‘इरसालकी’, ‘चापलूसरकी’, ‘साखरफुटाणे’, ‘गोली मार भेजेमें’, ‘सुरपारंब्या’ (प्रथम प्रकाशन २००१), ‘लगाव बत्ती’, डॉ. काणेकरांचा मुलगा, मखलाशी, मनमुराद, नानकटाई, खटल आणि खटला, चापटपोळी, मेतकूट, फटकेबाजी, तिकडमबाजी, आंबटचिंबट, मोतिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *