Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
IRCTC चा गोंधळ, पैसे जातात-बुकिंग होईना; रेल्वेचा मोठा निर्णय, ८ स्टेशनवर १२ काऊंटर... - Maharashtra 24

IRCTC चा गोंधळ, पैसे जातात-बुकिंग होईना; रेल्वेचा मोठा निर्णय, ८ स्टेशनवर १२ काऊंटर…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । आयआरसीटीसीच्या ॲप आणि संकेतस्थळावरुन रेल्वे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना अडचणीना तोंड द्यावं लागत आहे. आयआरसीटीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने देशभरातील रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा कोलमडली आहे. मंगळवारी पहाटे ३. ३० वाजल्यापासून हा बिघाड सुरू झाला आहे.


यंत्रणेच्या फायरवॉलमध्ये तंत्रिक बिघाड झाल्याने आरक्षण यंत्रणा बंद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं आयआरसीटीसी कॉर्पोरेट कार्यालयाचं म्हणणं आहे.

दरम्यान, प्रवासी सुविधेसाठी ऑफलाइन तिकीट बुक करण्यासाठी, आरक्षणसाठी अतिरिक्त तिकीट खिडकी सुरू करण्यात आल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र बारा तासानंतररदेखील ऑनलाइन यंत्रणा सुरू झाली नसल्याने मेल-एक्स्प्रेस तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी वाढू लागली आहे.

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानकातील एटीव्हीएममधून तिकीट काढण्यासाठी आयआरसीटीसीमधून आर्थिक व्यवहार पूर्ण होत नसल्याने एटीव्हीएम कार्यरत नाही, असं पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांनी समाज माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

प्लॅटफॉर्मवर जेवणाचा डबा धुण्यासाठी उभ्या राहिलेल्या मुलाला रेल्वेची धडक, जागीच मृत्यू

तिकीट बुकिंगच्या IRCTC वेबसाइटच्या तांत्रिक समस्येच्या पार्श्वभूमीवर, मुंबई विभागातील स्थानकांवर अतिरिक्त पीआरएस विंडो काउंटर सुरू करण्यात आले आहेत. खालील १२ ठिकाणी अतिरिक्त PRS काउंटर सुरू आहेत. इथे ऑफलाइन तिकीट बुक करता येईल.

सीएसएमटी : ५
कल्याण : २
वर्तक नगर : १
भायखळा : १
वाशी : १
मुलुंड : १
बदलापूर : १
चेंबूर : १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *