Raj Thackeray News : मुंबईतील कार्यक्रमात राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एक प्रचंड करीश्मा असलेले नेते आहेत. एवढंच नाही तर राज ठाकरे हे प्रचंड हजरजबाबीही आहेत. भाषण करताना त्यांना जर समोरून आवाज आला तर ते जे उत्तर देतात त्यामुळे एक तर प्रचंड हशा पिकतो किंवा समोरचा माणूस त्या उत्तराने गप्प होतो. तरुणांशी संवाद साधण्याची कलाही राज ठाकरेंना उत्तमरित्या अवगत आहे. अशा राज ठाकरेंना भाषण सुरु असताना जर कुणी लव्ह यू म्हणाला तर? कदाचित तुम्हाला वाटेल की ही गंमत आहे का? पण तसं मुळीच नाही. ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना’ आयोजित ‘महाराष्ट्र नवनिर्माण रीलबाज पुरस्कार सोहळ्या’त हे घडलं आणि राज ठाकरेंनी खास शैलीत त्यावर उत्तरही दिलं.

नेमकं काय घडलं पुरस्कार सोहळ्यात?
राज ठाकरे या पुरस्कार सोहळ्यात बोलायला उभे राहिले. त्यांनी भाषण त्यांच्या खास शैलीत सुरुही केलं. तेवढ्यात गर्दीतल्या एकजण राज ठाकरेंना उद्देशून म्हणाला “आय लव्ह यू राजसाहेब” त्या्यवर क्षणाचाही विलंब न करता राज ठाकरे म्हणाले ”लव्ह यू.” ज्यानंतर शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. यानंतर राज ठाकरेंनी मायकल जॅक्सनचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “असं मी मायकल जॅक्सनचं पाहिलं होतं. लव्ह यू असं त्याने केलं होतं. ” असं मायकल जॅक्सनचा आवाज काढत राज ठाकरे म्हणाले. ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

आणखी काय म्हणाले राज ठाकरे?
“मी हा सगळा कार्यक्रम सुरु असताना आतमधे बसलो होतो. अमित ठाकरे आल्यावर घोषणा सुरु झाल्या. अमित ठाकरे अंगार है बाकी सब भंगार है. भंगारात मी पण नाही ना येत? बाकी म्हणजे कोण?” असा मिश्किल प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला. तसंच अमित ठाकरेंनी आयोजित केलेला कार्यक्रम अभिनव आहे असं म्हणत अमित ठाकरेंचं कौतुकही केलं.

यावेळी राज ठाकरेंनी अनेक रिलबाज इथे आलेत. त्यावरही आपल्या खास शैलीत राज ठाकरेंनी भाष्य केलं. महाराष्ट्रात डान्सबार बंद झालेत त्यावेळी लागलेली सवय रिल्सच्या माध्यमातून पूर्ण झाली. एक एकटे बसलेले असतात रिल स्क्रोल कसे करतात बघा. असंही राज ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *