Virtus Electric Cycle : गिअर सायकलच्या किंमतीत मिळतेय दमदार इलेक्ट्रिक सायकल; ‘टाटा’ला देणार टक्कर!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । देशातील अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी असलेल्या व्हर्टस मोटर्सने इलेक्ट्रिक सायकल्सची नवीन सीरीज लाँच केली आहे. यामध्ये दोन दमदार ई-सायकलींचा समावेश आहे. साधारण गिअरच्या सायकलींची जेवढी किंमत असते, त्याच किंमतीत ही इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध करण्यात आली आहे.

पारंपारिक सायकल आणि ई-सायकलमधील दरी कमी करण्यासाठी ही सीरीज लाँच केल्याचं कंपनीने म्हटलं आहे. यापूर्वी टाटाच्या स्ट्रायडर कंपनीने एक इलेक्ट्रिक सायकल लाँच केली होती, मात्र व्हर्टसची ही सायकल त्याहून निम्म्या किंमतीत आल्यामुळे टाटाला फटका बसणार आहे.

व्हर्टस अल्फा
Virtus Alpha या नावाने दोन ई-सायकल लाँच करण्यात आल्या आहेत. Alpha A आणि Alpha I असे दोन व्हेरियंट यात उपलब्ध आहेत. या दोन्ही सायकलींमध्ये 8.0 Ah क्षमतेचा इनबिल्ट बॅटरी पॅक दिला आहे. फ्रंट अँड बॅक डिस्क ब्रेक, एलसीडी स्क्रीन असे फीचर्स दोन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत. कंपनीने आपल्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त या सायकल्स लाँच केल्या आहेत. यामध्ये ग्रे आणि ब्लू हे कलर ऑप्शन उपलब्ध आहेत.

दमदार रेंज आणि स्पीड
या इलेक्ट्रिक सायकलमध्ये 250W क्षमतेची मोटर देण्यात आली आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही सायकल 30 किलोमीटर धावू शकते. पॅडल सपोर्टसह ही रेंज 60 किलोमीटरपर्यंत वाढते. या सायकलचं वजन केवळ 20 किलो आहे, तर टॉप स्पीड 25 Kmph आहे. या सायकलमध्ये MTB फ्रेम दिली आहे.

किती आहे किंमत?
कंपनीने आपल्या नव्या ई-सायकलवर लाँचिंग डिस्काउंट जाहीर केला आहे. सुरुवातीच्या 50 ग्राहकांना ही सायकल केवळ 15,999 रुपयांना मिळेल. तर, त्यानंतरच्या 100 ग्राहकांसाठी 17,999 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. स्पेशल डिस्काउंट कालावधीमध्ये ही सायकल 19,999 रुपयांना उपलब्ध असेल. तर याची मूळ किंमत ही 24,999 रुपये आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन तुम्ही ही सायकल बुक करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *