Tomato Price : टोमॅटोमुळे शाकाहारी थाळी महागली ! किमतीत इतक्या टक्क्यांची वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । सध्या टोमॅटो शेतकऱ्यांना (Farmers) ‘अच्छे दिन’ आले असले, तरी सर्वसामान्यांना मात्र टोमॅटोच्या दरवाढीचा फटका बसल्याचं दिसून येत आहे. टोमॅटोच्या दरानं विक्रमी उंची गाठली आहे. गृहीणी टोमॅटो खरेदी करताना आणि स्वयंपाक करताना टोमॅटोचा वापर करताना दोन नाही तर, चार वेळा विचार करत असल्याचं चित्र आहे. टोमॅटोच्या वाढत्या दराचा परिणाम हॉटेल व्यवसायिकांवरही झाला आहे. परिणामी हॉटेलमधील शाकाहारी थाळीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

महागड्या टोमॅटोमुळे शाकाहारी थाळी महागली
टोमॅटोच्या वाढत्या दराचा परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील थाळीवरही दिसून येत आहे. जूनच्या तुलनेत शाकाहारी थाळीच्या किमतीत 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या ‘रोटी-तांदूळ दर’ अहवालात ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, टोमॅटोच्या वाढलेल्या दराचा परिणाम शाकाहारी थाळीवर झाला असून मांसाहारी थाळीवर तुलनेने कमी परिणाम झाला आहे. मांसाहारी थाळीची किंमत फक्त 11 टक्क्यांनी वाढली आहे.

शाकाहारी थाळीची किंमत किंमत 28 टक्क्यांची वाढ
रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या अहवालानुसार, सलग तिसऱ्या महिन्यात शाकाहारी थाळीची किंमत वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा वार्षिक दराच्या दृष्टीकोनातून किंमती जास्त प्रमाणार वाढल्या आहेत.

वेगवेगळ्या शहरांमध्ये टोमॅटोचे दर वेगवेगळे
टोमॅटोचे भाव जुलैमध्ये 233 टक्क्यांनी वाढून 110 रुपये प्रति किलोवर पोहोचले, जे जूनमध्ये केवळ 33 रुपये प्रति किलो होते. देशातील प्रत्येक शहरात टोमॅटोचे दर वेगवेगळे आहेत. राष्ट्रीय राजधानीत टोमॅटो दर्जानुसार 180-220 रुपये किलोने विकला जात आहे. मुंबईत टोमॅटोचा दर 120 ते 150 रुपये किलोने आहे.


अहवालात काय सांगतो?
या अहवालानुसार, कांदा आणि बटाट्याच्या किमतीत अनुक्रमे 16 टक्के आणि नऊ टक्क्यांनी वाढ झाली असून त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये मिरचीच्या किमती 69 टक्क्यांनी वाढल्या, क्रिसिलने म्हटले आहे, परंतु स्वयंपाकात त्याचा वापर मर्यादित असल्याने, शाकाहारी थाळीतील महागाईवर त्याचा परिणाम मर्यादित आहे. मांसाहारी थाळीच्या किमतीत वाढ झाल्याने चिकनच्या दरात तीन ते पाच टक्क्यांची घसरण झाली. मांसाहारी थाळीचा निम्मा खर्च चिकनचा असतो. वनस्पती तेलाच्या किमतीत दोन टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली. त्यामुळे दोन्ही थाळीच्या किमतीत वाढ झाल्याने हॉटेल व्यावसायिकांना मात्र, काहीसा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *