Sushant Singh Rajput : सेम टू सेम… सुशांत सिंह राजपूतचा ‘डुप्लिकेट’! चेहरा आणि लूक्स पाहून चाहतेही हैराण, AI चा वापर?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या निधनाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण, सुशांत सिंहचं चाहत्यांच्या मनातील स्थान कायम आहे. सुशांत सिंह राजपूतची रिअल लाईफमधील एक्सिट चाहत्यांच्या मनाला आजही बोचतेय. सुशांत हयात नसल्याचा धक्का चाहत्यांना आजही पचलेला नाही. सुशांतच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. आजही त्याचे जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या आठवणींना उजाळा देतात. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत सिंह राजपूतचा डुप्लिकेट दिसत आहे. हा व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सुशांत सिंह राजपूतचा ‘डुप्लिकेट’
सोशल मीडियावर अभिनेता सुशांत सिंह राजपूतसारख्या सेम-टू-सेम दिसणाऱ्या तरुणाचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. या तरुणाचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते आणि नेटकरी चांगलेच हैराण झालं आहेत. सुशात सिंह राजपूत परत आला का, असा सवाल अनेक चाहत्यांच्या मनाच उपस्थित झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या व्हायरल तरुणाचं नाव डोमिन अयान आहे. डोमिन अयानचा चेहरा आणि लूक्स अगदी सुशांतसारखे असल्याने चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

चेहरा आणि लूक्स पाहून चाहतेही हैराण
वूम्पला या इंस्टाग्राम अकाऊंटवर अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा डुप्लिकेट डोमिन अयानचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, डोमिन अयानचा चेहरा, स्टाईल, उंची अगदी सुशांत सिंह राजपूतसारखी असल्याचं व्हायरल फोटो आणि व्हिडीओंमधून दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की, दोन व्यक्ती इतके एकसारखे कसे दिसू शकतात. या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तुम्ही व्हायरल व्हिडीओ पाहिला का?

डुप्लिकेटच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सुशांत सिंह राजपूतच्या डुप्लिकेटच्या या व्हिडीओवर कमेंट करताना, एका युजरने लिहिलं आहे की, “मला वाटलं की तो सुशांत आहे. हुबेहुब त्याच्यासारखा दिसतो”. आणखी एका युजरने लिहिलं आहे की, “सुशांतचा चेहराही खूप गोंडस आणि निरागस होता”. आणखी एकाने लिहिलंय की, “मला माहित होते की सुशांत परत येईल”.

https://www.instagram.com/voompla/?utm_source=ig_embed&ig_rid=291ffda1-76b5-4732-892b-43415dc8c3ed

व्हायरल व्हिडीओ पाहून काही चाहते भावूक झाले आहेत, तर काहींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं की हा तरुण AI चा वापर करुन सुशांत सिंह राजपूत सारखा दिसण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी काही युजर्सनेही AI टेक्नॉलॉजीचा वापर केल्याचं म्हणत यावर नाराजी व्यक्त केली आहे. AI च्या वापरामुळे सुशांतचे काही चाहते भडकले आहेत.

फॅक्ट चेकमध्ये काय समोर आलं?
दरम्यान, आम्ही या तरुणाबाबत काही अधिक माहिती शोधली आहे. या तरुणाचं नाव डोमिन आयान असल्याचं म्हटलं जातं आहे. याचं नावाने त्याचं इंस्टाग्राम अकाऊंट आणि युट्यूब चॅनल आहे. इंस्टाग्रामवर donim.ayaan1513 या नावाने असणाऱ्या अकाऊंटवर या तरुणाचे अनेक व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. यासोबतच सुशांता सिंह राजपूतचेही काही व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *