विड्याचे पान; विड्याची पाने आणि त्याचं शास्त्रोक्त महत्व

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – विडा, अर्थात पान, (अन्य नाव: तांबूल 😉 हा भारतीय उपखंड व आग्नेय आशियात मुखशुद्ध्यर्थ चघळला/खाल्ला जाणारा पदार्थ आहे. काथ, चुना, सुपारी हे आवश्यक घटक नागवेलीच्या पानावर ठेवून पानाची पुरचुंडी केली की विडा बनतो. याशिवाय आवडीनुसार अणि उपलब्धतेनुसार विड्यात कंकोळ, कापूर, खसखस, खोबरे, जायपत्री, तंबाखू, बडीशेप, बदाम, लवंग, वेलदोडा, इत्यादी घटक पदार्थ असू शकतात. स्थानपरत्वे विड्याचे अनेकविध प्रकार आढळतात.

विड्याचे आकाराप्रमाणे आणि घडीनुसार गोविदविडा, पानपट्टी, पुडीचा विडा, पुणेरी विडा, मद्रासी विडा आदी प्रकार आहेत. विड्यासाठी वापरायच्या पानाचेही तिखट कलकत्ता पान, पूना पान, बनारसी, छोटे जोडीने घेतले जाणारे मघई पान आदी प्रकार आहेत.

#त्रयोदशगुणी विडा :
त्रयोदशगुणी विडा तेरा (त्रयोदश) प्रकारच्या मुखवासाचे पदार्थ वापरून तयार केलेला विडा आहे.

तेरा पदार्थ :
चुना
कात
सुपारी
विलायची
लवंग
बडीसोप
खोबरे
जायपत्री
जेष्ठमध
कापूर
कंकोळ
केशर
खसखस

#कातगोळ्या :
या काताच्या गोळ्या असतात. विड्यात सुगंधाकरता त्या घातल्या जातात.

प्रथम कात कुटून त्याची वस्त्रगाळ पूड करतात. त्यानंतर केवड्याची ताजी पाने घेऊन त्या पानांमध्ये ती पूड भरतात व ती पूड भरलेली केवड्याची पाने ६ ते ८ दिवस गुंडाळून, बांधून ठेवतात.

त्यानंतर ती बांधलेली पाने सोडवून केवड्याचा रस शोषलेली ती काताची किंचित ओलसर असलेली पूड निपटून वेगळी काढतात व अतिशय उच्च दर्जाचे केवड्याचे अत्तर अगदी किंचित हाताला घेऊन त्या पुडीच्या लहान आकाराच्या (खोगोच्या गोळ्यांएवढ्या) गोळ्या वळतात. पुढे साधारण महिनाभर या कातगोळ्या अगदी सहज टिकतात.त्यानंतर मात्र त्याला बुरशी येण्याची शक्यता असते.

या कातगोळ्या विड्यात घालून खाल्ल्यास विड्याला विशेष सुगंध येतो.

नारायणराव बालगंधर्व त्यांच्या विड्यात या कातगोळ्यांचा वापर करायचे.

#विड्याच्या पानाच्या उत्पतिची कथा
समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. तरी थोडे अमृत शिल्लक राहिले. मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंताजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृता मधून वेळ उगवली नागाप्रमाणे खुन्तावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने असलेली वेळ पाहून देवांना आनंद झाला व तिला नागवेल असे म्हटले. भोजन झाल्यावर देव देवता पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली.

#विड्याचे गुणधर्म
खाण्यासाठी जी पाने पिकलेली मधूर स्वादाची लहान पातळ असतात ती उत्तम औषधी गुणधर्म. रुची वाढवणारे, कांतीदायक, कफनाशक, सारक, शक्तीवर्धक, वायूनाशक, पोटसाफ ठेवणारे, पाचक, पित्तकारक, शरीरशुध्दी करणारे.
सर्वसामान्य उपाय सारखे नाक गळत असल्यास पानाचा एक चमचा रस घेउन थोडा कोमट करुन मधाबरोबर खाल्यास बरे वाटते.
सारखा कफ पडतो व छाती भरलेली असते अशा वेळी विड्याच्या पानांचा रस व अडूळसा रस असे मधामधून घेतले तर उतार पडतो.
गोडाधोडाचे जेवण झाल्यावर विडा खाल्यास पचन व्यवस्थित होते.
नियमितपणे साधा घरगुती विडा खाण्यास ठेवला तर शौचास साफ होते.
विड्याची पाने वाटून जखमेवर पोटीस लावले तर दोन दिवसात जखम भरते.
पान खाल्याने तोंडाची अरुची चिकटपणा व दुर्गंधी जाते.
पानात असणारा तिखटपणा जंतुनाशक असतो. त्यामुळे पान नुसते चावून खाल्ले तरी दात व तोंडासाठी ते उत्तम असते. शिवाय असे करणे दात किडिला प्रतिबंध करते.
पानात चुना, कात घातल्यास ते त्रिदोषाहारक होते मन प्रसन्न करते.
लहान मुलांच्या पोटफुगीवर नागवेलीच्या पानाचा रस व मध यांचे मिश्रण चाटवले तर मुलांचे अपचन दुर होते.
पानातील कॅल्शिअम शरीरामध्ये सहजतेने शोषले जात असल्याने विड्याचे पान जरुर खावे.
जर तुम्हाला अंथरूणावर पडल्या पडल्या झोप लागत नसेल तर झोपण्याआधी विड्याचं पान मीठ आणि ओव्यासकट चावून खावं चांगली झोप लागेल.
तोंड आल्यास विड्याची पान पाण्यात उकळून घ्या. या पाण्याने चूळ भरा म्हणजे तुम्हाला होत असलेला त्रास कमी होईल.
जर तुमच्या अंगाला खाज सुटत असेल तर विड्याची पान पाण्यात उकळून घ्या आणि त्या पाण्याने आंघोळ करा.
डोळ्यांना जळजळ किंवा डोळे लालसर दिसत असल्यास विड्याची पान पाण्यात उकळून ते पाणी थंड करा आणि त्या पाण्याने डोळे धुवा.
शरीरावर एखाद्या ठिकाणी भाजल्यास विड्याची पानाची पेस्ट बनवून लावा. काही वेळाने पेस्ट धुवून टाका आणि त्यावर मध लावा. त्या जागी जळजळ होणार नाही आणि डागही दिसणार नाही.
एखाद्या महिलेला प्रेग्नंसीनंतर स्तनपान देण्यात त्रास होत असल्यास विड्याची पान धूवून मोहरीच्या तेलासोबत तव्यावर थोडी भाजून घ्या. थोडं कोमट झाल्यावर दोन्ही स्तनांच्या निप्पल्सच्या आसपास लावा. सूज आणि वेदना कमी होतील.
उन्हाळ्यात जास्त करून अनेकांना नाकाचा घोण्या फुटण्याचा त्रास होतो. हे टाळण्यासाठी विड्याची पान कुस्करून त्याचा वास घ्या. लगेच फरक पडेल.
जर तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल तर विड्याच्या पानाच्या रसात मध मिक्स करून घेतल्यास एनर्जी टॉनिकप्रमाणे तुम्हाला उर्जा मिळेल.
जर एखाद्या महिलेला श्वेत पदराचा त्रास असेल तर 10 पान 2 लीटर पाण्यात उकळून घ्या आणि मग त्या पाण्याने योनी धुवा. यामुळे श्वेतपदराची समस्या दूर होईल.

#विड्याची पाने आणि त्याचं शास्त्रोक्त महत्व :

या विड्याच्या पानाच्या टोकास “लक्ष्मी” चा वास असतो.
विडयाच्या पानाच्या उजव्या बाजूस “ब्रम्हदेवांचा” वास असतो.
या विडयाच्या पानाच्या मधोमध “सरस्वती देवीचा” वास असतो.
विडयाच्या पानाच्या डाव्या बाजूस “पार्वतीदेवीचा” वास असतो.
या विडयाच्या पानाच्या लहान देठा मधे “महाविष्णूचा” वास असतो.
विडयाच्या पानाच्या मागीलबाजूस “चंद्रदेवता” वास
असतो.
या विडयाच्या पानाच्या सर्व कोपऱ्या मधे “परमेश्वरा” चा वास असतो.
विडयाच्या पानाखाली “मृत्युदेवते”चा वास असतो.
(या कारणाने ताम्बूलसेवन करतांना बुडाचा भागकाढून मग सेवन करण्याची पद्धत).
विडयाच्या पानाच्या देठात “अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी” राहतात.
(म्हणूनच पान सेवन करतांना देठ काढून देतात. अहंकार आणि दारिद्रय लक्ष्मी येऊ नये याअर्थी..)
विडयाच्या पानात मध्यभागा नंतर मन्मथाचा वास असतो.
यासर्व देवतांचा विडयाच्या पानामधे वास असल्यामुळे ताम्बूलास इतके महत्त्व आहे.
पूर्व किंवा उत्तरदिशेस पानाचे टोक येईल असे ठेऊन देवास नैवेद्य दाखवावा.
कोणा कडेही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगंच तो उपभोगावा.
मंगळवारी, शुक्रवारी कोणत्याही कारणे विडयाची पाने घरा बाहेर जाऊ देऊ नयेत.
हिरवीगार आणि मस्त हस्ताकार असलेली कोवळी पाने नैवेद्यास ठेवावीत आणि तांबूल म्हणून द्यावीत..

कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना… हे गाणं ऐकताच डोळ्यासमोर येतो मस्तपैकी तयार केलेला विडा. विड्याच्या पानाचं भारताच्या इतिहासाशी आणि परंपरांशी खूप जुनं नात आहे. पानाचा वापर हा फक्त विडा म्हणून नाहीतर अनेक गंभीर आजार दूर करण्यासाठीही केला जातो. आजही भारताच्या प्रत्येक गल्लीत, चौकात किंवा मुख्य भागांमध्ये पानपट्टी हमखास दिसतेच. यावरून हेच कळतं की, विड्याचं पान हे फक्त भारतातल्या नवाब किंवा राजाचंच नाहीतर सामान्य जनतेचंही आवडतं आहे. पान तांबूली किंवा नागवेल नामक वेलीचं हे पान असतं. याच पानाला इंग्रजीमध्ये बीटल लीफ, हिंदीमध्ये पानचं पान, तेलगूमध्ये तमालपाकु तर मराठीत याला तांबुल असं म्हटलं जातं. स्वादानुसार पानाचे चार प्रकार असतात – कडू, आंबट, तिखट आणि गोड. पानाच्या औषधीय गुणांचा उल्लेख हा चरक संहिता या पुराण ग्रंथातही केलेला आढळतो. पानामध्ये बाष्पशील तेलांसोबतच अमिनो अॅसिड, कार्बोहायड्रेट आणि अनेक प्रकारची विटॅमीन्सही आढळतात.

पान हा भारतीय खाद्य परंपरेचा मुख्य भाग आहे. कारण जेवण झाल्यावर तोंडाची चव कायम ठेवण्यासाठी राजा-महाराजांच्या काळापासून अगदी आत्तापर्यंत पानाचा वापर केला जातो. भरपेट मेजवानीनंतर आजही पान खाणं मस्ट मानलं जातं. आपल्या भारतीय परंपरेत तर देवालाही पानाचा विडा करून वाहिला जातो आणि नंतर तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो. प्रत्येक पूजेत किंवा सणावाराला विड्याच्या पानाचा वापर हा शुभ मानला जातो. यामुळे विड्याच्या पानाचे शुभ प्रतीक आणि चमत्कारी आयुर्वैदीक गुण असे दुहेरी फायदे आहेत.

#विड्याच्या पानाचे फायदे :
जास्तकरून लोक नुसतं विड्याचं पान खाण्याऐवजी तंबाकू-सुपारी किंवा यावर गुलकंद घालून पानाचा विडा खाणं पसंत करतात. पण हे पान फक्त तुमच्या तोंडाची चवच वाढवत असं नाहीतर याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.

भूक वाढवण्यासाठी
ज्या लोकांना भूक न लागण्याची तक्रार असते त्यांच्यासाठी हे पान खाणं खूपच फायदेशीर आहे. सकाळच्या नाश्त्याच्या वेळी तुम्ही काळ्या मिरीसोबत पानाचं सेवन केल्यास तुम्हाला व्यवस्थित भूक लागेल.

मधुमेहावर गुणकारी
विड्याच्या पानं ही ब्लड शुगर कंट्रोल करण्यातही सहाय्यक असात आणि अँटी डायबिटीक गुणांसाठीही ओळखली जातात. एक संशोधनानुसार जी लोक नियमितपणे पानाचं सेवन करतात त्यांना डायबिटीस होण्याचा धोका कमी असतो.

डोकेदुखीवर फायदेशीर
कितीही भयंकर डोकेदुखी असो, पानं वाटून त्याचा रस कपाळावर लावल्यास काही मिनिटांतच डोकेदुखी दूर होईल.

जखम भरते लवकर
विड्याच्या पानाचा रस जर तुम्ही जखमेवर लावला आणि त्यावर पट्टी बांधून ठेवली तर तुमची जखम दोन दिवसात भरते. याशिवाय विड्याच्या पानाचा उपयोग हा फोड किंवा गळू आल्यावरही केला जातो. विड्याची पान थोडीशा गरम करून त्यावर एरंडेल तेल लावून ते फोड आलेल्या ठिकाणा लावल्यास आराम मिळतो.

सर्दी खोकल्यावर गुणकारी
विड्याचं पान हे सर्दी खोकला आणि कफ यावर खूपच गुणकारी आहे. याशिवाय पानाचा वापर हा श्वास घ्यायला त्रास होत असल्यास, अस्थमा यासांरख्या रोगांमध्येही होतो. जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर विड्याचं पान मधासोबत खाल्ल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

चेहरा होईल सुंदर
पानाचा वापर हा चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग किंवा मुरूमापासून सुटका मिळवण्यासाठीही केला जातो. कारण पानांमध्ये असतात अँटी बॅक्टेरियल गुण जे तुमच्या त्वचेला फंगल इन्फेक्शनपासून वाचवतात. पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी विड्याची 8 ते 10 पान घेऊन वाटून घ्या. मग ही वाटलेली पान दोन ग्लास पाण्यात मिक्स करून ते पाणी चांगल आटेपर्यंत उकळून घ्या. आता हा फेसपॅक चेहऱ्यावर वापरा. यामुळे तुमचे पिंपल्स होतील दूर आणि चेहरा होईल डागविरहीत.

गायकांसाठी वरदान
अनेक गायकांना तुम्ही पानाचं सेवन करताना पाहिलं असेल. कारण पानाचं सेवन केल्याने तुमचा आवाज स्वच्छ आणि पातळ होतो. विड्याच्या पानाचं पाणी प्यायल्यास तुमच्या गळ्याशी संबंधित अनेक समस्याही दूर होतील.

दातांसाठी लाभदायक
पानात असलेल्या अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे तोंडातील रोगाणु, बॅक्टेरिया आणि श्वासाशी निगडीत इतर रोगांपासून आपला बचाव होतो. विड्याची पान चावून खाल्ल्याने तोंड स्वच्छ होतं आणि दातही चांगले राहतात. तसंच तुमच्या हिरड्याही मजबूत राहतात.

गॅस्ट्रीक समस्यांपासून सुटका
पोटांशी निगडीत कोणताही प्रोब्लेम असल्यास तुम्हाला विड्याच्या पानाच्या सेवनाने आराम मिळतो. कारण विड्याच पान हे थंड असतं. त्यामुळे विड्याच्या पानांचा रस प्यायल्याने गॅस्ट्रीक अल्सर होत नाही.

तोंडाची दुर्गंधी होईल दूर
विड्याच्या पानाला सर्वात उत्तम माऊथ फ्रेशनर मानलं जातं. कारण या पानांमधील घटक आपल्या तोंडाची दुर्गंधी दूर करतात. यामुळे विड्याच्या पानाचा वापर हा जास्तकरून माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो.

कामोत्तेजना वाढेल
विड्याचं पान हे कामोत्तेजना वाढवण्यात सहाय्यक मानलं जातं. पूर्वीच्या काळी लोक आपल्या प्रणय क्षणांना अजून अविस्मरणीय बनवण्यासाठी आणि सेक्स पॉवर वाढवण्यासाठी याचा वापर करत असत. असं म्हणतात की, सेक्सआधी पान खाल्ल्याने तुमच्या सेक्स अनुभव अजूनच आनंदी होतो.

पचनशक्ती सुधारते
विड्याची पान चावून खाल्ल्यास तुमचं पचन तंत्रही सुधारतं. जेव्हा आपण विड्याचं पान चावून खातो तेव्हा आपल्या लाळ ग्रंथीवर त्याचा परिणाम होतो. जो आपल्या पचनतंत्र सुधारते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *