युद्धाची तयारी करा, कामाला लागा… उत्तर कोरियाच्या किम जोंग उनचे लष्कराला आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी लष्कराच्या सर्वोच्च जनरलची हकालपट्टी केली. तसेच युद्धाची वाढती शक्यता लक्षात घेऊन किम जोंग उन यांनी इतर अधिकारी वर्गाला लष्करी सराव आणि शस्त्रास्त्रांचे उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले. केसीएनएने गुरुवारी ही माहिती दिली. केंद्रीय लष्करी आयोगाच्या बैठकीत किम यांनी हे वक्तव्य केल्याचे अहवालात म्हटले आहे. या दरम्यान, त्यांनी उत्तर कोरियाच्या शत्रूंना रोखण्यासाठी प्रत्युत्तरादाखल पावले उचलण्याच्या योजनेवर चर्चा केल्याचेही नमूद केले आहे.

KCNA च्या रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाचे सर्वोच्च जनरल, चीफ ऑफ जनरल स्टाफ पाक सु इल यांना ‘बडतर्फ’ करण्यात आले आहे. जनरल पाक हे जवळपास सात महिने लष्कराचे सर्वोच्च जनरल म्हणून सरकारमध्ये कार्यरत होते. जनरल री योंग गिल यांनी आता पाक सु इलची जागा घेतली आहे. त्यांनी यापूर्वी देशाचे संरक्षण मंत्री आणि सैन्याच्या सर्वोच्च कमांडरचे पदही भूषवले आहे.

यापूर्वीही री योंग होते आर्मी चीफ
री योंग गिल यांची पहिले लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2016 मध्ये जेव्हा त्यांची बदली झाली, तेव्हा री यांची बडतर्फी आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये ते न दिसल्यामुळे दक्षिण कोरियामध्ये त्यांच्या फाशीच्या बातम्यांच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, काही महिन्यांनंतर त्यांच्या नावाचा अन्य वरिष्ठ पदासाठी प्रस्ताव आल्याने ते पुन्हा चर्चेत आले होते. या अहवालात अधिक तपशील न देता म्हटले आहे की, किम यांनी शस्त्रास्त्र निर्मिती क्षमता वाढवण्याचेही ध्येय ठेवले आहे. नेत्याने गेल्या आठवड्यात शस्त्रास्त्र कारखान्यांना भेट दिली, जिथे त्यांनी क्षेपणास्त्र इंजिन, तोफखाना आणि इतर शस्त्रे तयार करण्याची संख्या वाढविण्यास सांगितले.

उत्तर कोरिया ९ सप्टेंबरला मिलिशिया परेड आयोजित करणार
उत्तर कोरियाने युक्रेनविरुद्ध रशियाला शस्त्रे पुरवल्याचा आरोप अमेरिकेने केला. मात्र, रशिया आणि उत्तर कोरियाने हा दावा फेटाळून लावला आहे. अहवालात म्हटले आहे की किम जोंग उन यांनी आपल्या सैन्याला युद्धासाठी तयार राहण्यासाठी देशातील अत्याधुनिक शस्त्रे आणि उपकरणांसह सराव करण्यास सांगितले. उत्तर कोरिया प्रजासत्ताक स्थापना दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ९ सप्टेंबरला मिलिशिया परेड आयोजित करणार आहेत. देशात अनेक निमलष्करी गट आहेत ज्यांचा वापर ते आपल्या लष्करी दलांना बळकट करण्यासाठी करत असतात.

दरम्यान, युनायटेड स्टेट्स आणि दक्षिण कोरिया 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान लष्करी सराव करणार आहेत. ही बाब उत्तर कोरिया सुरक्षेसाठी धोका असल्याचे बोलले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *