हा आहार तुमच्या शरीरातून विषारी घटक बाहेर काढू शकते का? जाणून घ्या ते कसे काम करते

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । अनेक लोक शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्याचा विचार करून डिटॉक्स उत्पादनांचे सेवन सुरू करतात, पण प्रत्यक्षात असे कधीही होत नाही. आपल्या शरीरामध्ये विषारी पदार्थ बाहेर काढण्याची म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन करण्याची पुरेपूर क्षमता आहे. यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि आतडे यांसारखे अवयव सतत नको असलेल्या घटकांवर प्रक्रिया करत असतात. या सर्व अवयवांसाठी एक मुख्य कार्यप्रक्रिया निश्चित आहे. याशिवाय विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढण्याची आणि आपल्या आरोग्याची एकूण स्थिती चांगली राखण्याची एक यंत्रणादेखील आपल्या शरीरात असते. म्हणून आपल्या अवयवाला इतर बाह्य उत्पादने किंवा डिटॉक्स उत्पादनांची गरजच नसते. पण, आपले शरीर स्वतःहून जे कार्य करू शकते त्यापेक्षा आणखी चांगले काम करण्यासाठी डिटॉक्स ज्युस, डिटॉक्स टी आणि डिटॉक्स पावडर मदत करते.

तुमच्या शरीरातील यकृत, किडनी, फुफ्फुसे आणि आतडे सतत कार्यरत असतात आणि स्वतःला डिटॉक्सिफाय करण्यासाठी सक्षम असतात. फक्त तुमच्या यकृत आणि किडनीच्या आरोग्याची काळजी घ्या, असे मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या क्लिनिकल डायटीशियन नियती नाईक यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

जर हा सिद्धांत खरा असेल, तर सतत आपल्या आरोग्य प्रणालींमध्ये ( System) तयार होणारे विषारी पदार्थ उत्सर्जित करण्यास शरीर सक्षम नसेल तर आपण सर्व आजारी पडू शकतो. शरीराच्या डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेची काळजी घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे यकृत आणि मूत्रपिंडाची काळजी घेणे. हे शरीरातील टाकावू पदार्थ काढून टाकणारे मुख्य अवयव आहेत. तुम्हाला शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढायचे असतील तर अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड आणि फ्रेंच फ्राईजसारखे पॅक केलेले अन्न, साखर असलेले पदार्थ, फॅट्स असलेले पदार्थ टाळले पाहिजे आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा आणि भरपूर पाणी प्या. या सर्व पदार्थांमध्ये भरपूर साखर, फॅट्स आणि मीठ आहेत; ज्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

तसेच डिटॉक्सिफिकेशन ही निरंतर प्रक्रिया आहे. तुम्ही एखाद्या डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेतून गेलात याचा अर्थ असा नाही की, विषारी पदार्थ तुमच्या शरीरात पुन्हा प्रवेश करणार नाहीत. आपण खात असलेल्या अन्नामधून आणि हवेतील रसायनामधून अनेक जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करत असतात.

या उत्पादनांची आणखी एक समस्या अशी आहे की, डिटॉक्स उत्पादनांचे एक चांगले औषध संशोधन म्हणून नियमन केलेले नाहीत. त्यामुळे डिटॉक्स उत्पादनांचा वारंवार वापर केल्यावर दुष्परिणाम होतात की नाही याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही.

शरीरासाठी खरोखर काय फायदेशीर आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. व्यायाम, चांगली झोप आणि तणाव नियंत्रित करण्यासह निरोगी संतुलित आहार (balanced diet) हे शरीरासाठी फायदेशीर आहे, हे समजून घेतले पाहिजे. जेव्हा आपण संतुलित आहाराबद्दल बोलतो, तेव्हा फळे आणि भाज्यांसह पुरेशा प्रमाणातील लीन प्रोटीन आणि कॉम्लेक्स, शुद्ध नसलेल्या, कर्बोदकांच्या वाढलेल्या गुणोत्तरांबद्दल (ratio ) बोलत असतो.

आणखी एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा की, जेव्हा आपण आरोग्यामध्ये सुधारणा आणि शरीराची प्रणाली साफ करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा दीर्घकाळासाठी औषधांचा अतिवापर करणे टाळले पाहिजे, कारण ते शरीरात विष तयार करू शकते. शरीरामध्ये योग्य पाण्याची पातळी राखणे आणि मद्य सेवन टाळणे आरोग्यासाठी लाभदायी ठरू शकते.

तर निष्कर्ष असा की, प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत सजग असले पाहिजे आणि कोणत्याही बाह्य उत्पादनांवर अवलंबून राहू नये, जे आरोग्यासाठी आणखी हानी पोहचवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *