अक्षय कुमार – सनी देओल यांच्यामध्ये ‘कांटे की टक्कर’, बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘ओएमजी २’ आणि अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमा ११ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी प्रदर्शित झाला. दोन्ही सिनेमे दमदार असल्यामुळे कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक कोणता सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यानंतर कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसचा ‘बाजीगर’ समोर आला आहे. प्रेक्षकांनी ‘ओएमजी २’ सिनेमाला नाही तर, ‘गदर २’ सिनेमाला अधिक पसंती दिली आहे. सध्या सर्वत्र सिनेमाच्या कमाईची चर्चा रंगत आहे.

अक्षय कुमार – सनी देओल यांच्यामध्ये ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. पण या शर्यतीत सनी देओल यांच्या ‘गदर २’ सिनेमाने बाजी मारली आहे. दिल्ली पासून ते चेन्नईपर्यंत ‘गदर २’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सनी देओल यांच्या सिनेमाची कथा अधिक तगडी नसली तरी, ‘गदर’ सिनेमाच्या लोकप्रियतेमुळे ‘गरद २’ सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहात गर्दी केली.

तब्बल २२ वर्षांनंतर ‘गदर’ या सुपरहिट सिनेमाचा ‘गदर २’ सिक्वेल प्रदर्शित झाला आहे, ज्याबद्दल चाहत्यांची क्रेझ सर्वत्र स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. बुकिंगमध्ये सनी देओल यांच्या गदर २ सिनेमाची २० लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली. या सिनेमाने पहिल्याच दिवशी ४० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

तर अक्षय कुमार याच्या ‘ओएमजी २’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ११ ऑगस्ट रोजी सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाची कथा चाहत्यांना आवडली आहे. सिनेमाच्या टीझर, ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली, पण सिनेमाची ओपनिंग कमाई फार कमी झाली आहे. अक्षय कुमार याच्या ‘ओएमजी २’ सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त ९.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

आता शनिवार आणि रविवार असल्यामुळे ‘गदर २’ की ‘ओएमजी २’ कोणता सिनेमा बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्ली एनसीआर, मुंबई, लखनऊ, भोपाळ यांसारख्या इतर शहरांमध्ये देखील ‘गदर २’ सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. तर माउथ पब्लिसीटीचा फायदा ‘ओएमजी २’ सिनेमाला होणार की नाही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वीकेंड निमित्त ‘गदर २’ सिनेमा ७० ते ८० कोटी रुपयांची कमाई करु शकेल अशा शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अक्षय कुमारा स्टारर ‘ओएमजी २’ सिनेमा ४० कोटी रुपयांपर्यंत मजल मारू शकतो अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. सध्या सर्वत्र ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *