Loksabha Election 2024 : ‘मुख्यमंत्री खाऊ घेऊनआले तो क्षण’ संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच, क्षणात व्हायरल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ मे ।। इथं राज्यात निवडणुकांची रणधुमाळी अद्याप सुरु असताना आणि आता अवघ्या पाचव्या टप्प्यासाठीचं मतदान उरलेलं असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी x च्या माध्यमातून एक सोशल मीडिया पोस्ट केली. प्रथमदर्शनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोणा एका दौऱ्यादरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचं लक्षात आलं.

राऊतांनी हा व्हिडीओ शेअर करत असताना त्यासोबत दिलेल्या कॅप्शननं मात्र सर्वांचच लक्ष वेधलं. ‘नाशिकमध्ये रात्रीस पैशांचा खेळ चाले’ असा काहीसा सूर आळवणारी खळबळजनक पोस्ट शिवसेना ठाकरे गटाचे राऊतांनी केली आणि त्यांच्या या शब्दांनी अनेकांच्या नजरा वळवल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ पोस्ट करत राऊतांनी खळबळजनक आरोप केले. ‘दोन तासांच्या दौऱ्यांसाठी एवढ्या जड बॅगा कशासाठी वापरल्या जात आहेत, मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण…’ असा आरोप करत राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा तो व्हिडिओ पोस्ट केला. निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे अशी टीकाही राऊतां या पोस्टच्या माध्यमातून केली. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु असल्याचा आरोप करत त्यांनी राज्यात सध्या नेमकं काय सुरुये, या परिस्थितीकडे नागरिकांचं लक्ष वेधत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.

‘निवडणूक आयोगाचं लक्ष आमच्यावरच आहे. कारण, या मंडळींकडे कोणाचंही लक्ष नसून, नाशिकमधील व्हिडीओ हा त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. झडती झाली असती, तर त्या हेलिकॉप्टरमधून तब्बल 9 बॅगा उतरल्या आणि पोलिसांसमोर त्या नेण्यात आल्या. पण, त्यात काय होतं सांगू शकेल कोणी?’ असा सवाल करत, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांसमवेत किमान 12 ते 13 कोटी रुपये नाशिकला आल्याचा दावा राऊतांनी केला.

आतापर्यंत या बॅगा उतरवण्याचा व्हिडीओ आपण ट्विट केल्यानंतर ते पैसे नेमके कोणाला दिले हेसुद्धा आपण उघडकीस आणणार असल्याचं स्पष्ट करत राऊतांनी सत्ताधारी सरकारी यंत्रणांचा वापर करून पैशांचं वाटप करत असल्याचा गंभीर आरोप लावला. सोमवारी सकाळी एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी हे टीकास्त्र डागलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *