सलग १९ व्या दिवशी डिझेलच्या किंमतीत वाढ ; प्रथमच डिझेल ८० पार; दरवाढीचा उच्चांक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर असतानाही देशातील इंधन दरात वाढ सुरुच आहे. आज, गुरुवारी सलग १९ व्या दिवशी डिझेलच्या किंमतीत वाढ झाली. डिझेल १४ पैशांनी तर पेट्रोल १६ पैशांनी वाढले. गेल्या १९ दिवसांत डिझेलच्या दरात प्रतिलिटर १०.६२ रुपयांनी तर पेट्रोल दरात ८.६६ रुपयांनी वाढ झाली आहे. सलग १९ व्या दिवशी झालेल्या दरवाढीने देशाची राजधानी दिल्लीत डिझेलचा दर प्रतिलिटर ८० रुपयांवर गेला आहे.

दिल्लीत पेट्रोल १६ पैशांनी वाढून प्रतिलिटर ७९.९२ रुपयांवर तर डिझेल १४ पैशांनी वाढून ८०.०२ रुपयांवर पोहोचले आहे. तर पेट्रोलचा दर ८६.७० रुपये


दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत बदल केला जातो. सकाळपासूनच नवीन दर लागू केले जातात. पेट्रोल, डिझेलच्या दरात सीमा शुल्क, डिलर कमीशन तसेच इतर खर्च जोडण्यात आल्यानंतर त्यांचे दर जवळपास दुप्पट होतात. विदेशी मुद्रा तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड किंमतीच्या आधारे दररोज पेट्रोल तसेच डिझेलच्या दरात बदल केला जातो. या मापदंडानूसार पेट्रोल, डिझेलचे दर रोज निश्चित करण्याचे काम तेल कंपन्यांकडून केला जातो. पेट्रोल पंप चालक स्वत:चा नफा जोडून पेट्रोलची विक्री करतात. पेट्रोल, डिझेलच्या दरात हा खर्चही जोडला जातो. देशातील पेट्रोल-डिझेलवरील कर ६९ टक्के झाला आहे. जगात हे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या वर्षभरात भारतात पेट्रोल-डिझेलवर ५० टक्क्यांपर्यंत कर होता. विकसित अर्थव्यवस्थेत अमेरिकेत १९ टक्के, जापान मध्ये ४७ तसेच ब्रिटेनमध्ये ६२, फ्रान्समध्ये ६३ टक्के करस्वरूपात वसूल करण्यात येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *