सुबोध काकाणीयांना राजपाल नियुक्त उद्योग क्षेत्रातुन विधान परिषद घेण्यात यावं..

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – मराठवाडा विशेषप्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड – श्रीमती ज्यांची गुलामी करते असूनही कोणत्याही प्रकारची घमेंड नसलेले *काकाणी*परिवारातील पुरुषोत्तम राजाराम काकाणी या दाम्पत्याला दि. 16/10/1978 रोजी पुत्ररत्नाचा हेंद्राबाद येथे जन्म झाला. घरातील अगदी लहानपण पासूनच लाडका असलेले हे मुलं अगदी कमी वयातच नावा रुपाला येऊ लागले ते त्याच्यातील सर्व जाती धर्मातील तळागाळातील लोकांच्या मदतीला धावून जाण्याच्या प्रवृतीमुळे जनमानसात त्याच्या विषयी आपोआप आदर निर्माण होऊन कोणीही निस्वार्थ त्याचा होऊन जातो असे हे धर्माबादकराणा लाभलेले व्यक्तीमत्व अगदी फोन वर जरी मदत मागितली तर ती काही वेळात मदत पोहचता करणारे मी पाहिलेले सुबोध काकाणी कोरोना वायरस च्या लॉकडाऊन काळात शहरवासीयांना हाताला काम नाही शहरात हातावर पोट असलेली गोरगरीब जनता त्यांच्या घरात कशी चूल पेटेल या विवंचनेत असलेला व आपली तळमळ मित्र परिवारांना सांगून त्यांच्या संकल्पने तुन साकार झालेले *गावकरी किचेन च्या मधून शहरातील रोज 20 ते 23 हजार जनतेची भूख भागवण्याचे सारखे 32 दिवसात 6,50,000 अन्नचे पाकीट व्यवस्तीत घरपोच दिले जवळ जवळ 700 कींंटल तांदूळा ची खिचडी करून दिल्यामुळे या उपक्रमाची नोंद राज्यस्तरीय स्तरावर झाली. *गावकरी किचन*मधूनघरोघरी जाऊन खिचडी वाटप करणारे सुबोध काकाणी.

तालुक्यातील मोठे अधिकारी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, तहसीलदार दत्तात्रय शिंदे, पोलीस निरीक्षक सोहन माच्छर, मुख्यधिकारी देवरे. धर्माबाद शहराचे उपनगर अध्यक्ष विनायक रावजी कुळकर्णी शहरातील सर्व नगरसेवक. व प्रतिष्टीत नागरिक यांना या माध्यमा तुन सेवा करण्याची संधी मिळून देणारा सर्व खर्च स्वतः करून हि कोणत्याच प्रकारचा आव न आणणारा मी पाहिलेला देव माणूस सुबोध काकाणी यांनी बुलढाणा अर्बन बॅंकेच्या व स्वतः च्या माध्यमातुन आपल्या परिसरातील जनतेच्या समस्याचे बारकाईने अभ्यास करून ती पूर्णत्वास आणण्याच्या जिद्दीने आपणाला यांच्या साठी काही तरी करावेच लागेल या विवंचनेतुन त्यांच्या संकल्पना साकार करणारे सुबोध काकाणी धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व प्रथम प्राधान्य दिले ते शेतकर्याचं शेत माल ठेवण्यासाठी अतकूर शिवारात भव्य असे 8हजार मेट्रिक टन व 7 हजार मेट्रिक टन क्षमतेचे 10वेअर हाऊस ची निर्मिती केली.सर्व परिसरात cctv बसून जिल्ह्यातील एकमेव ठिकाण असलेली शासन दरबारी नोंद आहे. तिरुपती देवस्थानला सण 2015 मध्ये 5 लाख व 2016मध्ये 10 लाख दान दिले आहेत धर्माबाद परिसरात मोठया प्रमाणात उधोग निर्माती करून 500जणांना कायम स्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला अतकूरगावास माजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या संकल्पने तुन दत्तक घेतले.2016मध्ये कोरडा दुष्काळ पडला असताना शहरवासियांना मोफत दिवस रात्र पाणी पुरवठा टेक्टर द्वारे केला.बुलढाणा अर्बन बॅंक व दिवाणी न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर मध्ये 526रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला होता.धर्माबाद तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामात तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.काकाणी व ड्रा. अरुण डोंगरे यांच्या काळात मोफत जी सी बी उपलब्ध करून दिली होती त्यामुळे पूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

शहरात रुग्णांना ने आन करण्यासाठी रुग्णवाहनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी हेरलं व तीचा लोकार्पण सोहळा पारपडला त्या मुळे तालुक्यातील रुग्णांचा प्रश्न मार्गीलागला लगेच त्यांनी शववाहिनीची तालुख्यतः गरज आहे म्हणून तीही दिमतीत उभी केली.तालुक्यात कुठेही आग लागल्या वर ती वीजवण्यासाठी अग्निशमन गाडी सुद्धा जनतेच्या सेवे साठी दिली कोविड -19 च्या काळात धर्माबाद नगर पालिका हद्दीत निर्जंतुकीकरन करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा नगरपालिकेस मोफत उपलब्ध करून दिली.धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समीती परिसरात हमाल मापाडी, व्यापारी, शेतकऱ्या व जनते साठी पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळावे म्हणून या परिवारा कडून करण्यात आले आहे.कोविड-19पासून देशास व राज्यास मदत म्हणून या काकाणी परिवारा काडून अचानक धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयास भेट व तेथील कोरोना कक्ष पाहणी साठी आलेले नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ड्रा.विपीन इटनकर यांना स्वघरी येण्याचे आमंत्रण देऊन पंतप्रधान सहायता निधी म्हूणन 250000 व मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी म्हणून 250000 चा धनादेश संपत केला. आता तालुक्यातील सर्व जाती धर्मातील जनतेच्या पाल्याना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून अतकूर शिवारात भव्य असे राजाराम काकाणी सहकार विद्या मंदिर स्थापन करण्यासाठी इमारत बाधकाम प्रगती पथावर आहे.परिसरातील गोरगरीब मुलींच्या लग्नासाठी ते 11000, हजार रुपये आपल्या आजोबा राजाराम काकाणी यांच्या नावे देतात.यांच्या या सेवाभावी व्रताची दखल उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी जिल्हाप्रशासनस देऊन ती महाराष्ट्रचे राज्यपाल  यांच्या पर्यंत पोहचवण्याचे काम जिल्हा प्रशासनाणे केले आहे या कामाची दखल राज्यपालंनी घेऊन मा.सुबोध काकाणी यांना नुकतेच सांगण्यात आली आहे.त्यांच्या या विविध कामाची दखल घेऊन राज्यपाल यांनी उधोग क्षेत्रातुन विधान परिषद वर नियुक्त करावयाची मागणीने जोर धरला आहे

.तालुक्यातील युवावर्गाने सामूहिक निवेदन देण्यासाठी गावोंगावी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे.सुबोध काकाणी यांना विधान परिषद वर उद्योग क्षेत्रातुन घेण्यात यावे म्हणून धर्माबाद तालुक्यातील 52 ग्रामपंचायत पैकी 38ग्रामपंचायतिने तसा ठराव घेतला आहे उर्वरित ग्रामपंचायत मध्ये तसा ठराव घेण्यासाठीची प्रक्रिया चालू आहे.तसे काकाणी परिवाराचे सर्वच राजकीय पक्षतील नेत्यांना सोबत चांगले संबंध आहेत.माजी राज्यपाल श्री.विद्यसागर राव यांचे कौटुंबिक ट संबंध होते.ते कोणत्या पक्षची मदत घेतात या कडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहे.आपल्या तालुक्यात जे जे जण उपयोगी आहे त्या गोष्टी चा बारकाईने अभ्यास करून ती कशी अमलात आणावी त्याचा जनतेला कसा फायदा होईल असे हे सुबोध काकाणी या परिसरातील असे व्यक्तीमत्व आहे की ते कोणत्याही राजकीय पक्षात नाहीत. तरी ते लोकप्रिय आहेत.अशी व्यक्ती उद्योग क्षेत्रातुन विधान परिषद सदस्य झाल्यास आम्हांला त्यांच्या अभिमानच होईल असे धर्माबाद येथील जनता व माजी नगर सेविका सौ.नीता गायकवाड यांनी म्हणले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *