महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – उदगीर – विशेष प्रतिनिधी – जीवन भोसले – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्याचे अदेश असताना, वर्ग सुरू ठेवणार्या उदगीर येथिल अक्षरनंदन शाळेच्या मुख्याध्यापकांवर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सद्या कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमानात आहे तरी, जिल्हाधिकारी जी .श्रीकांत यांचे आदेशा नुसार विद्यालय, महाविद्यालय, जिल्यातील सर्व शैक्षिक संस्था सुरू ठेवण्यास मनाई केली आहे. शासनाचे कठोर नियम असताणा देखिल उदगीर येथिल अक्षरनंदन शाळेत विद्यार्थ्याच्या जिवाची पर्वा न करता केवळ आर्थिक व्यवहारा साठी शिकवणी वर्ग चालू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शाळेमध्ये इयत्ता दहावी वर्ग सुरू केल्याबाबत संबंधित शाळेतील प्राथमिक व माध्यामीक विभागाचे मुख्याध्यापक यांची चैकशी करण्यात आली, माध्यमिक चे प्राचार्य .मारोती तुकाराम बिरादार यानी दहावीच्या 90 विद्यार्थ्या पेैकी प्रतिदिन 20 विद्यार्थी बोलवण्यात आलेला प्रकार उघडकीस आला,अक्षरनंदन हायस्कूल मलकापूर येथिल मुख्याध्यापकांनी जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याचा अहवाल संबंधित अधिकारी यांच्या कडे चैकशी अहवाल सादर केला , तहसिलदार मुंडे यांनी संबंधितांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या आदेश भंग भारतीय दंड संहिता 1860 साथरोग प्रतिबंध का. 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व अपत्ती व्यवस्थापन अधिनीयम 2005 .या तरतुदी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संबंधित प्राधिकृत अधिकारी भगवान फुलारी गायब असल्याने , मंडळ अधिकारी शंकर जाधव यानी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली, सदरील तक्रारीवरून मंगळवारी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ह पुर्ण करण्यात आली , या प्रकरणात मुख्याध्यापका बरोबर संस्थेचे पदाधिकारी दोषी असून त्यांच्या वर ही कारवाई करण्यात यावी असी मागणी पालक वर्गातून केली जात आहे,