एक छोटा तुकडा डार्क चॉकलेट खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ मे ।। डार्क चॉकलेटमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि मिनरल्स असतात. अनेक अभ्यासाअंती हे समोर आले आहे की डार्क चॉकलेटमुळे तुमचे आरोग्य सुधारू शकते. तसेच हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. आम्ही तुम्हाला डार्क चॉकलेटचे अनेक फायदे सांगत आहोत.

डार्क चॉकलेटमध्ये ११ ग्रॅम फायबर, ६६ टक्के आर्यन, ५७ टक्के मॅग्नेशियम, १९६ टक्के तांबे आणि ८५ टक्के मँगनीज ही पोषकतत्वे असतात जी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. डार्क चॉकलेटमध्ये इतर चॉकलेटच्या तुलनेत कोको अधिक असते आणि साखर कमी असते. यामुळे ती अधिक फायदेशीर ठरते.

फायदे
डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. डार्क चॉकलेटमधील फ्लॅवेनॉल लायकोपीन भरपूर असल्याने डार्क चॉकलेट एकूण कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडचा स्तर कमी करतात.

डार्क चॉकलेटमधील बायोअॅक्टिव्ह यौगिक आपल्या त्वचेसाठी चांगली असतात. यातील फ्लेवनॉस्स सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव करतात.

डार्क चॉकलेटमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे मूड चांगला राहतो. यातील तत्व तणाव निर्माण करणारे कॉर्टिसोल हार्मोन नियंत्रित करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *