T-20 WC आधी इंग्लंडच्या गोठ्यात चिंता ! या स्टार खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह,कारण..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे ।। टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेपूर्वी इंग्लंड आणि पाकिस्ताना या दोन्ही संघांमध्ये ४ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडचा संघ सध्या आघाडीवर आहे. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी(२८ मे) पार पडणार आहे. मात्र या सामन्यात जोस बटलर खेळताना दिसून येणार नाहीये. मालिकेतील दुसरा सामना झाल्यानंतर तो कौटुंबिक कारणास्तव घरी परतला आहे.

जोस बटलरकडे इंग्लंड संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याने सोमवारी झालेल्या सराव सत्रात सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. मालिकेतील चौथा सामना गुरुवारी खेळला जाणार आहे. हा सामना झाल्यानंतर गुरुवारी इंग्लंडचा संघ अमेरिकेला जाण्यासाठी रवाना होणार आहे. जोस बटलर केव्हा कमबॅक करणार आणि तो इंग्लंड संघासोबत अमेरिकेला जाणार की नाही? हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

जोस बटलर तिसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे त्याने काही दिवस कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड संघाची जबाबदारी जोस बटलरवर सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेत इंग्लंडचा पहिला सामना ४ जून रोजी स्कॉटलँडसोबत होणार आहे. त्यामुळे तो या सामन्यासाठी हजर राहणार की नाही, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

जर या सामन्यासाठी उपलब्ध राहु शकला नाही, तर इंग्लंडचा संघ उपकर्णधारासह मैदानात उतरु शकतो. जोस बटलर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी केल्यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यातही वादळी खेळी केली होती.

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ:
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले,लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टॉपली, मार्क वुड, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *