महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे ।। राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की मनुस्मृती ग्रंथावर लोकांचा आक्षेप असला तरी ज्या श्लोकाचा अब्यासक्रमात समावेश करण्याचा विचार केला जात आहे तो श्लोक अतिशय चांगला आहे.
दीपक केसरकर म्हणाले, मनुस्मृतीमधील तो श्लोक आक्षेपार्ह नाही. तो श्लोक अतिशय चांगला आहे. त्या ग्रंथातील अनेक भागांवर लोकांचे आक्षेप आहेत. सर्वसाधारणपणे त्यातील काही ठराविक भागांवर आक्षेप असून आमचं त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. आम्ही त्याचं समर्थन किंवा प्रचार करत नाही. मनुस्मृतीतील आक्षेपार्ह मजकुराचा आम्ही प्रचार करत नाही. मात्री ज्या श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे त्या श्लोकात एकही चूक नाही. त्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी या श्लोकातील एक तरी चूक दाखवावी. राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात तो श्लोक शिकवला जातोय. सीबीएसई बोर्ड तो श्लोक शिकवत आहे.