महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२९ मे ।। पुण्यातील पोर्शे घटनेप्रकरणी सोमवारी ससून सामान्य रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. अटकेच्या दुसऱ्या दिवशीमपोलिसांनी सांगितले की, हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पल संकलनादरम्यान सुमारे दोन तासांत 14 वेळा अल्पवयीन मुलाच्या वडिलांशी फोनवर बोलले होते. यामुळे खळबळ माजली आहे. तसेच डॉ. अजय तावरे याचाच ब्लड रिपोर्ट बदल्याण्याचा मुख्य प्लॅन होता, अशी माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटक केलेले डॉ अजय तावरे आणि श्रीहरी लळनोर या दोघांच्या पोलीस कोठडीची न्यायालयात मागणी केली. ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी लाच घेतल्याचे आढळले असल्याचे पोलिसांनी सांगितले. अल्कोहोलची उपस्थिती दर्शवनारा अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल कचऱ्यात टाकले. आणि त्याच्या जागी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना तपासण्यासाठी पाठवण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी डॉ. तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर, अपघाती वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालयातील शवागारात काम करणारे अतुल घाटकांबळे यांच्याशी संबंधित परिसराची झडती घेतली. त्यांच्याकडून डॉ हळनोर यांच्याकडून अडीच लाख रुपये आणि घाटकांबळे यांच्याकडून 50 हजार रुपये जप्त करण्यात आले. (Pune Porsche incident update)
हळनोर आणि घाटकांबळे यांच्याकडून वसूल केलेली रक्कम त्यांना मिळालेली हिस्सा असल्याचे समजते. परंतु तपासाचे मुख्य केंद्र आता डॉ तावरे यांचे आर्थिक व्यवहार आहे, त्यांना किती पैसे मिळाले किंवा कोणाकडून आश्वासन दिले गेले, याचा तपास सुरु असल्याते, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
“दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे रक्ताचा नमुना जो त्यांनी अल्पवयीन मुलाच्या नमुन्याने बदलला. आमच्या तपासणीतून असे दिसून आले आहे की, तपासणीला अडथळा आणण्यासाठी नमुना बदलण्याची, रक्तातील अल्कोहोल एकाग्रता चाचणीमध्ये छेडछाड करण्याची डॉ तावरे यांची कल्पना होती,” असे देखील पोलिसांनी सांगितले.
अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने 19 मे रोजी सकाळी 11 च्या सुमारास ससून हॉस्पिटलमध्ये गोळा करण्यात आले. कॉल डिटेल रेकॉर्डच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की त्यापूर्वीच्या दोन तासांत डॉ. तावरे आणि त्यांच्यामध्ये तब्बल 14 कॉल्स झाले होते. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्याकडून हे कॉल व्हॉट्सॲप, फेसटाइम आणि स्टँडर्ड सेल्युलर कनेक्शनवरही (standard cellular connection) केले गेले होते.
“या कॉल्सचा तपशील तपासाचा भाग म्हणून तांत्रिक विश्लेषणामध्ये प्राप्त झाला आहे. तावरे यांच्याशी विशाल अग्रवाल कसे जोडले गेले आणि त्यांच्यात मध्यस्थी करणारे दुसरे कोणी होते का, याचाही आम्ही तपास करत आहोत”, असे अधिकारी म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.