महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२९ मे ।।आपल्या शरीराला कोणताही पदार्थ पचवण्याची क्षमता असेल तर आपण कधीच आजारी पडत नाही. पण, पचनसंस्था बिघडली असेल तर मात्र शरीर सतत आजारी पडायला लागतं. आपली खाद्यपदार्थांची आवड, झोपेची वेळ या गोष्टीही पचनावर परिणाम करणाऱ्या ठरतात. आज जागतिक पचन संस्था दिन (World Digestive Health Day 2024) आहे.
आरोग्यासाठी पाणी पिणे फार आवश्यक आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी हे फार आवश्यक आहे. पण बऱ्याचदा नुसतं पाणी पिऊन चालत नाही. काही पदार्थांचं पाणी हे शरीरासाठी विशेष पोषक ठरतं. असेच काही खास पदार्थ आहेत त्यांचं पाणी प्यायल्याने आरोग्याला फार लाभ होतो. चला जाणून घेऊया त्याविषयी.
राईस वॉटर
तांदूळ आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यात भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. तांदळाच्या पाण्याने शरीराला भरपूर फायदेही होतात. यामुळे एनर्जी बूस्ट होते. चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याची चमक वाढते. चेहऱ्याला नॅचरल चमक मिळते. शिवाय केसांना लावल्याने केस मजबूत होऊन गळणं कमी होतं.
लेमन वॉटर
व्हिटॅमीन सीने भरपूर असं लिंबू पाणी वजन करण्यासाठी बेस्ट आहे. यामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशन होत नाही. यामुळे पचन सुधारते शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. शिवाय चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याची चमक वाढते.
बडिशेपचं पाणी
बडिशेपचं पाणी वजन कमी करण्यासाठी चांगला फॉर्मुला समजला जातो. याचे पाचक एंझाइम्स मेटाबोलिझमला बूस्ट करते. यामुळ पचन स्मूथ होते आणि पोटाच्या समस्या कमी होतात. यामुळे महिलांमध्ये पाळीच्या समस्याही कमी होतात.
आल्याचं पाणी
जसे आले शरीरासाठी उपयुक्त समजले जाते तसेच याचे पाणीही उपयुक्त आहे. यामुळे पचन स्मूथ होते, मेटाबोलीझम चांगले होते आणि शरीरातले टॉक्सिन्सही बाहेर पडतात. याच्या अँटी इंफ्लेमेटरी गुणांनी डोक्यात किंवा शरीराच्या कोणत्याही भागतले दुखणे कमी होते.
पुदिन्याचं पाणी
पुदिन्याच्या पाण्याने शरीर हायड्रेट राहतं. यामुळे शरीरात जमलेले सगळे टॉक्सिन्स बाहेर पडतात. यामुळे पचनशक्ती मजबूत होते. एक्स्ट्रा फॅट्स विरघळून बाहेर पडतात. चेहऱ्यावर लावल्याने रंग उजळतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.