महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० मे ।। शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट केले जातील असा आरोप करुन महाड या ठिकाणी जितेंद्र आव्हाड महाडच्या चवदार तळ्यावर आंदोलन केलं. मनुस्मृती फाडताना त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होतो आहे. भाजपाने या कृतीविरोधात राज्यभरात आंदोलन केलं आहे. या सगळ्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
मनुस्मृतीतला एकही श्लोक कुठल्याही अभ्यासक्रमात घेण्याचा विचारही महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आलेला नाही. आजच नाही कधीही आलेला नाही. त्यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही. त्यामुळे तो काही प्रश्नच नाही. आमचे विरोधक रोज खोटं बोलतात आणि त्यासाठी मुद्दा शोधून काढतात. ज्यांनी चर्चा सुरु केली त्यांनीच आंदोलन सुरु केलं. ते आंदोलन कसं खोटं होतं हे आपण पाहिलं. आंदोलन करताना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांनी (जितेंद्र आव्हाड) फाडला. महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.