महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० मे ।। MPSC Exam Date News: एमपीएससी परीक्षेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एमपीएससीची परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आलीय. 6 जुलैऐवजी 21 जुलैला एमपीएससीची परीक्षा पार पडणार आहे. आर्थिक मागासवर्गीयांना ओबीसीमधून अर्ज करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. EWS विद्यार्थ्यांना ओबीसीमधून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी विनंती याआधीच करण्यात आली होती. ती विनंती मान्य करत अखेर परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतचं निवेदनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलंय.