पिंपरी चिंचवड – सत्यम ज्वेलर्स समृद्ध अनुभवाचा अप्रतिम अलंकार

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 ऑनलाईन – सत्यम ज्वेलर्स, अप्रतिम सुंदर अलंकार खरेदीचा समृद्ध अनुभव देणारा निगडी, पिंपरी चिंचवड शहरातला नावाजलेला ज्वेलरी ब्रँड. दागिन्यांची विविधता, सुंदरता आणि उच्च कारागिरी असलेले दागिने आपणांस सत्यम ज्वेलर्सकडे खरेदी करावयास मिळतील.गेल्या ४१ वर्षांपासून सत्यम ज्वेलर्सने आपल्या ग्राहकांना अतिशय सुंदर दागिन्यांचा खजाना उपलब्ध करून दिला आहे.


वेडिंग ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी, इत्यादी ज्वेलरी प्रकारात सत्यम ज्वेलर्स अग्रेसर आहे. आपल्या घरातील शुभ कार्यासाठी किंवा आयुष्यातील सगळे गोड क्षण अविस्मरणीय बनविण्यासाठी सत्यम ज्वेलर्स नेहमी दागिन्यांची भरपूर व्हरायटी उपलब्ध करून देत असते.खास करून सत्यम ज्वेलर्सच्या अँटीक ज्वेलरी कलेक्शनची ग्राहकांमध्ये खूप क्रेझ आहे. कमी वजनाच्या तरीही अप्रतिम सुंदर अशा या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी सत्यमच्या निगडी, कृष्णानगर, चाकण ह्या तिन्ही शोरूम्समध्ये ग्राहक वारंवार भेट देत असतात.

सत्यम ज्वेलर्स मध्ये सर्व प्रकारच्या दागिन्यांची खरेदी करताना विनम्र ग्राहक सेवा, पारदर्शक व्यवहार आणि सुंदर दागिन्यांची विविधता ह्याचा अत्युच्च अनुभव आपणांस मिळेल ह्याची सत्यम ज्वेलर्सला खात्री आहे. तसेच आपली दागिन्यांप्रती असलेली प्रत्येक आवड-निवड जपण्याची जबाबदारी टिम सत्यम ज्वेलर्स जबाबदारीने पार पाडत असते.
आपणां सर्वांना सोने खरेदी कधी ही आणि कुठे ही करता यावी म्हणून सत्यम ज्वेलर्स सादर करीत आहेत “सत्यम डिजी-गोल्ड ऍप”. यामध्ये आपण आपल्या सोईनुसार सोन्याची खरेदी अगदी घरबसल्या करू शकता. याशिवाय सत्यम ज्वेलर्सने आपल्या ग्राहकांसाठी सोने गुंतवणूकीचे अनेक प्लॅन्स ही उपलब्ध केले आहेत, ग्राहक अनेक वर्षांपासून ह्या प्लॅन्सचा लाभ घेत आहेत.


चांदीच्या दागिन्यांचीही असंख्य उपलब्धता सत्यम ज्वेलर्सने आपल्या ग्राहकांसाठी आपल्या “सत्यम सिल्वर” ह्या पिंपरी चिंचवड मधील सर्वात मोठ्या म्हणजेच ५००० स्क्वे. फु. च्या दालनात करून दिली आहे. चांदीच्या दागिन्यांपासून ते चांदीची विविध भांडी, लग्नात दिल्या जाणाऱ्या आणि कॉर्पोरेट भेटवस्तुंची रेलचेल आपणांस “सत्यम सिल्वर” मध्ये पहावयास मिळते.


तर आता वाट कशाची बघताय ?
लवकरच सत्यम ज्वेलर्सच्या निगडी, चाकण आणि कृष्णानगर शाखांना भेट द्या आणि खरेदीचा आनंद घ्या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *